आता दहावीच्या निकालाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 12:54 AM2020-07-18T00:54:59+5:302020-07-18T00:55:13+5:30
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुरुवारी (दि.१६) बारावीचा निकाल जाहीर केल्यानंतर आता दहावीचा निकाल कधी लागणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले
आहे.
बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आा दहावीच्या निकालाबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. मात्र, यंदा कोरोनासंकटामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या महिनाअखेरपर्यंत दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. २०१९ मध्ये दहावीची परीक्षा आणि निकाल या दोन्ही गोष्टी वेळेत पार पडल्या होत्या. गेल्या वर्षी दहावीचा निकाल ८ जून २०१९ रोजी जाहीर करण्यात आला होता. यंदा कोरोनासंकटामुळे हा निकाल बराच पुढे ढकलण्यात आला आहे. दरम्यान यंदा दहावीची परीक्षा दि. ३ ते २३ मार्चदरम्यान पार पडली.