आता वीकेंड घरातच ; हॉटेलिंग राहणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:46+5:302021-06-28T04:11:46+5:30
नाशिक - कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले असून, त्यामुळे वीकेंड हॉटलिंग यापुढेही बंदच राहणार ...
नाशिक - कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूमुळे राज्यातील निर्बंध पुन्हा कडक करण्यात आले असून, त्यामुळे वीकेंड हॉटलिंग यापुढेही बंदच राहणार आहे. नाशिककरांना आपला वीकेंड घरातच घालवावा लागणार आहे. नाशिक शहरातील हॉटेल व्यावसायिकांना पूर्वीप्रमाणेच शनिवारी व रविवारी पार्सल सेवा देता येणार आहे, तर सोमवारी ते शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉटेल्स सुरू ठेवता येणार आहेत. परंतु, या कालावधीत व्यावसायिकांना ५० टक्के क्षमतेचे निर्बंध असणार आहे. विशेष म्हणजे या वेळेत हॉटेलिंग, बार आणि लॉजिंगचे ग्राहकच नसल्याने संपूर्ण हॉटेलिंग व्यावसायच ठप्प झाल्याची प्रतिक्रिया हॉटेल व्यावसायिक व्यक्त करीत आहेत. दरम्यान, छोटेखानी हॉटेल व्यावसायिकांना मात्र यावेळेत ग्राहक मिळत असले तरी त्यांना सायंकाळी लवकर शटर डाऊन करावे लागत असल्याने त्यांच्यामध्येही नाराजीचा सूर उमटत आहे.
---
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार
- सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी ४ यावेळेत ५० टक्के क्षमतेसह व्यवसाय करता येणार
- सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेनंतर रात्री ८ पर्यंत घरपोहोच सेवा देता येईल.
- शनिवारी व रविवारी सकाळे सात ते रात्री ८ वाजेपर्यंत घरपोहोच सेवा
- व्यावसायिकांकडून सायंकाळची वेळ मिळण्याची मागणी
पॉईंटर -
शहरातील एकूण हॉटेल्स २७८५
हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी -२७,८५०
---
हॉटेल व्यावसाय पुन्हा कधी उभा राहणार ?
सध्या हॉटेलिंग व्यावसाय पूर्णपणे ठप्प आहे. प्रशासनाने दिलेल्या सकाळी ७ ते सायंकाळी ४ यावेळेत कोणी ग्राहक हॉटेलमध्ये फिरकतही नाही. त्यामुळे सकाळी ११ ते रात्री ११ या वेळत हॉटेल्सला परवानगी मिळण्याची गरज आहे. अन्यथा व्यावसाय कसा करायचा, असा प्रश्न हॉटेल चालकांसमोर आहे.
- संजय चव्हाण, अध्यक्ष, हॉटेल्स बार असोसिएशन, नाशिक
--
निर्बंधांमुळे पुरेसा व्यवसाय होत नसला तरी कर्मचाऱ्यांचा पगार, वीजबिल, भाडे, परवाना शुल्क, कर्जाचे हप्ते असे प्रश्न आहेत. निर्बंधांमुळे दररोजच्या व्यवसायातून हा खर्चही भागत नाही. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजच्या माध्यमातून व्यावसायिकांना दिलासा देण्याची गरज आहे.
- दिलीप जाधव, हॉटेल व्यावसायिक
--
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
निर्बंधांमुळे हॉटेलची वेळ कमी करण्यात आली आहे. ग्राहकच नसल्याने कामाचा वेळ आणि पगार दोन्ही कमी झाल्याने आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काम बंद झाल्यास कटुंबाच्या उदरनिर्वाहासोबतच अन्य खर्चाचे गणित जुळवताना कसरत करावी लागते.
- शिवराम कातोरे, हॉटेल कर्मचारी
---
हॉटेलिंगमध्ये ग्राहकांना आनंद मिळतो. त्यामुळे हॉटेलिंगच्या तुलनेत होम डिलिव्हरीला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे वेटर व डिलिव्हरी बॉयचे काम गेले आहे. आता हे काम पुन्हा मिळणार की नाही याची शाश्वती नाही. काम मिळाले नाही तर घर कसे चालवायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रोहन साळवी, हॉटेल कार्मचारी
===Photopath===
270621\27nsk_38_27062021_13.jpg
===Caption===
डमी