आता रोजच्या जेवणात मिळणार काळा अन् लाल भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 08:30 PM2020-06-18T20:30:55+5:302020-06-18T20:31:04+5:30
पेठ : एरवी आपल्या रोजच्या जेवणातील भाताचा रंग हा पांढराच असतो. मात्र यापुढील काळात या ऐवजी काळा आणि लाल भात आपल्या ताटासमोर आला तर आश्चर्य वाटू नये. कारण पेठ तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या नव्या भाताच्या प्रजातींचे बीजोत्पादन करण्याचा प्रायोगिक प्रयोग सुरू केला आहे.
रामदास शिंदे
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : एरवी आपल्या रोजच्या जेवणातील भाताचा रंग हा पांढराच असतो. मात्र यापुढील काळात या ऐवजी काळा आणि लाल भात आपल्या ताटासमोर आला तर आश्चर्य वाटू नये. कारण पेठ तालुक्यात प्रथमच अशा प्रकारच्या नव्या भाताच्या प्रजातींचे बीजोत्पादन करण्याचा प्रायोगिक प्रयोग सुरू केला आहे.
पेठ तालुक्यातील जवळपास १०० शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वनराज शेतकरी गटाची स्थापना करु न गट शेतीला प्राधान्य दिले. मिश्रफळबागेसह विविध तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात येत आहेत. शेतीला पूरक व्यवसाय करण्यासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. या वर्षी पेठ तालुक्यात रत्नागिरी( ब्लॅक राईस), रत्नागिरी (रेड राईस) आणि रत्नागिरी-६ अशा तीन प्रकारच्या भाताचे बीजोत्पादन करण्यात येणार आहे. कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या सहकार्याने तालुक्यातील शेतकर्यांना मागणी प्रमाणे प्रत्येकी एक एकर साठी भात बियाणाचा पुरवठा करण्यात येणार असून अशा प्रकारच्या भात बीजोत्पादनाचा पहिलाच प्रयोग राबवण्यात येत असल्याने शेतकºयांमध्येही या नवीन भाताच्या उत्पादनाबाबत उत्सूकता आहे.
पेठ तालुका तसा भात पिकासाठी पोषक असून कृषी विभाग व आत्मा प्रकल्प यांच्या मार्गदर्शनाने वनराज तर्फे नवीन तीन प्रकारच्या भाताचे बीजोत्पादन करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकºयांनी या प्रक्रि या उपक्र मात सहभागी व्हावे.
- यशवंत गावंडे, शेतकरी, गावंधपाडा ता. पेठ.