प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता दसऱ्याचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 03:49 PM2018-08-23T15:49:39+5:302018-08-23T15:49:51+5:30

सटाणा:बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना अखेर मुहूर्त सापडले आहे. हरणबारी डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा आणि केळझर चारी क्र मांक आठच्या कामाला येत्या दसर्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार राज्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय.एस.चहल यांनी जाहीर केले आहे.

 Nowadays, the work of pending irrigation projects | प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता दसऱ्याचा मुहूर्त

प्रलंबित सिंचन प्रकल्पांच्या कामांना आता दसऱ्याचा मुहूर्त

Next

सटाणा:बागलाण तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना अखेर मुहूर्त सापडले आहे. हरणबारी डावा कालवा, हरणबारी उजवा कालवा आणि केळझर चारी क्र मांक आठच्या कामाला येत्या दसर्याला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात येणार राज्याचे जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव आय.एस.चहल यांनी जाहीर केले आहे. बागलाण तालुक्यातील जलसिंचन प्रकल्पांची आढावा बैठक मुंबई येथे खासदार डॉ.सुभाष भामरे ,जलसंपदाचे मुख्य सचिव आय.एस.चहल यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.त्यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.
बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर एक्सप्रेस कालव्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.याच कामावरील साधनसामग्री हरणबारी डाव्या कालव्याच्या कामासाठी वापरण्यात येईल असेही मुख्य सचिव चहल यांनी स्पष्ट केले आहे.हरणबारी उजव्या कालव्यासाठी देखील राज्य सरकार सकारात्मक आहे.मात्र आधीच्या सरकारने हा कालवा मापदंडात बसत नसल्याचा शेरा दिला होता.त्यामुळे तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यास मोठा कालावधी गेला.आता त्याच्यातून मार्ग निघाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कोणत्याही सिंचन प्रकल्पासाठी पाच कोटी रु पयांचा निधी खर्च करण्याचा अधिकार प्रधान सचिवांना असून हरणबारी उजव्या कालव्यासाठी आतापर्यंत केवळ ५४ दलघफु पाणीसाठा उपलब्ध असल्याने हरणबारी उजव्या कालव्याच्या अपूर्ण असलेल्या कामापासून (पारनेरपासून) पिहल्या पाच किमीसाठी पाच कोटी व पुढील टप्प्यासाठी पाच कोटी रु पयांचा निधी खास बाब म्हणून लवकरच मंजूर होणार असल्याचेही मुख्य सचिव चहल यांनी सांगितले. केळझर चारी क्र मांक आठचा प्रश्न देखील निकाली असून ३० सप्टेंबर पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरु वात करण्याचे आदेश आपण सबंधित अधिकाºयांना दिले असल्याचे चहल यांनी स्पष्ट केले. या बैठकीस डॉ.शेषराव पाटील,नगराध्यक्ष सुनील मोरे,धुळ्याचे गजेंद्र अंपाळकर, सुरेश भामरे, आदींसह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Web Title:  Nowadays, the work of pending irrigation projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक