बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:37 PM2019-01-10T14:37:45+5:302019-01-10T14:39:47+5:30

नाशिक : बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात ...

nshik,distribution,caste,validity,certificates,student,science Branch | बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप

बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप

Next
ठळक मुद्दे डिसेंबर २०१८ अखेर ४१८१ प्रकरणांवर निर्णय

नाशिक : बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जात वैधता प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. केटीएचएम महाविद्यालय येथे सन २०१८-१९ शैक्षणिक वर्षातील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
इयत्ता बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षा संपल्यानंतर विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जासोबतच जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याबाबत प्रवेश नियंत्रण प्राधिकरणाने सन २०१८-१९ पासून अनिवार्य केलेले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येत आहे.
बुधवार, दि. ९ रोजी केटीएचएम महाविद्यालय येथील सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटोळे, उपायुक्त माधव वाघ, संशोधन अधिकारी राकेश पाटील, केटीचएम महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे विजय कोर, केटीएचएम महाविद्यालयाच्या लव्हाटे यांनी केले होते.
सन २०१८-१९ या शैक्षणिकवर्षात इयत्ता बारावी विज्ञान शाखेत प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपावेतो जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी समितीकडे अर्ज केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी महाविद्यालयामार्फत समितीकडे दि. ३१ जानेवारी २०१९ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन समितीकडून करण्यात आले आहे.
विज्ञान शाखेत प्रवेशित बारावीच्या विद्यार्थ्यांचे डिसेंबर २०१८ अखेर ४१८१ प्रकरणांवर निर्णय घेण्यात आलेला असून विद्यार्थ्यांचे वैधता प्रमाणपत्र टपालाने पाठविण्यात आले आहे. तसेच ९५० त्रुटीची प्रकरणे असून त्यांना एसएमएसव्दारे व कार्यालयाकडून त्रुटी कळविण्यात येत आहेत. तरी विद्यार्थी, पालक यांनी त्रुटी पूर्तता समितीकडे लवकरात लवकर सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: nshik,distribution,caste,validity,certificates,student,science Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.