शिक्षक, शिक्षकेतर कर्मचरी महासंघाला सहा कोटी मिळविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 05:15 PM2018-08-14T17:15:41+5:302018-08-14T17:22:24+5:30

nshik,teacher,teaching,staff,achieves,six,crores | शिक्षक, शिक्षकेतर कर्मचरी महासंघाला सहा कोटी मिळविण्यात यश

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचरी महासंघाला सहा कोटी मिळविण्यात यश

Next
ठळक मुद्देखासगी शाळा महासंघ : शिक्षण उपसंचालकांचे प्रयत्नशिक्षण विभागाची दिरंगाई


नाशिक : खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मागील वर्षातील शासनाकडे थकीत असलेले सुमारे सहा कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून परत मिळविण्यास खासगी प्राथमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचरी महासंघाला यश आले आहे. महासंघाच्या शिष्टमंडळाने या प्रकरणी शिक्षण संचालकांची भेट घेतली होती.
जिल्ह्यातील खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांचे मागीलवर्षी शासनाकडे अनुदान थकीत होते. त्यात वरिष्ठ वेतनश्रेणीचा फरक, वैद्यकीय बिले, नियमित मंजुरी असलेली फरकाची बिले, प्लॅन, नॉन प्लॅन अशी एकूण सहा कोटी १४ लाख ८४ हजार ९०९ एवढी रक्कम परत गेली आहे. मार्च २०१८ मध्ये परत गेलेले अनुदान गेल्या पाच महिन्यांपासून लालफितीतच अडकून पडल्याने शिक्षक व शिक्षकेतर महासंघाने शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांची भेट घेतली आणि त्यांच्यापुढे समस्या मांडली होती. या प्रकरणी टेमकर यांनी संबंधित अधिकाºयांकडे चौकशी करून सदर रक्कम पुन्हा खात्यावर घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मोठा निधी पुन्हा प्राप्त झाला आहे.
याप्रसंगी शिष्टमंडळाने संचमान्यता दुरुस्ती तसेच २० टक्के शाळांच्या मुद्द्यावरदेखील चर्चा केली. शिष्टमंडळात महासंघाचे जिल्हाध्यक्ष नंदलाल धांडे, उपाध्यक्ष हरिकृष्ण सानप, सचिव सुनील बिरारी, कोषाध्यक्ष दादाजी अहेर, जिल्हा प्रबंधक अविनाश साळुंके, मालेगाव तालुकाध्यक्ष विकास मंडळ, राज्य सचिव विकास थिटे आदी उपस्थित होेते.
--इन्फो--
शिक्षण विभागाची दिरंगाई
शिक्षण विभागाची दिरंगाई आणि बेपर्वाईमुळे खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांचे मागीलवर्षी शासनाकडे अनुदान थकीत होते. प्रकरणी शिक्षण विभागाच्या अधिकाºयांकडे वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर शिक्षण संचालकांची भेट घ्यावी लागली त्यामुळे कोट्यवधींचा निधी परत मिळाला.
- नंदलाल धांडे,
जिल्हाध्यक्ष, महासंघ

Web Title: nshik,teacher,teaching,staff,achieves,six,crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.