कोरोना लस देण्यासाठी ॲक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 08:25 PM2020-12-11T20:25:57+5:302020-12-11T20:27:14+5:30

नाशिक : कोरोना लसची उपलब्धता आणि साठवणुकीबाबत सध्या देशपातळीवर चर्चा सुरू आहे. याबरोबरच या लसीचे वितरण आणि उपलब्धता कशी ...

nsk,action,plan,for,corona,vaccination | कोरोना लस देण्यासाठी ॲक्शन प्लॅन

कोरोना लस देण्यासाठी ॲक्शन प्लॅन

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : निकषानुसार स्टेारेजही उपलब्ध

नाशिक : कोरोना लसची उपलब्धता आणि साठवणुकीबाबत सध्या देशपातळीवर चर्चा सुरू आहे. याबरोबरच या लसीचे वितरण आणि उपलब्धता कशी असेल, याबाबतही मंथन सुरू असताना नाशिक जिल्ह्यासाठी लस उपलब्ध झाली तर त्यासाठीचा ॲक्शन प्लॅन तयार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी झालेल्या कालवा आढावा बैठकीनंतर भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबतची माहिती दिली. नाशकात रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी आहे. लस उपलब्ध झाल्यावर ती नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार आहे. यासाठीचा नियोजनबद्ध कार्यक्रम आखला जाणार असून, लस साठवणुकीसाठी निकषानुसार योग्य स्टोरेज तयार असल्याचेदेखील भुजबळ यांनी सांगितले.
      दरम्यान, दिल्लीतील आंदोलनामुळे अन्नधान्य पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले. सद्य:स्थितीत राज्यात धान्याचा मुबलक साठा आहे; परंतु पंजाब, हरयाणातील शेतकरी आंदोलनात सक्रिय असल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले तर त्याचा परिणाम नक्कीच पुरवठ्यावर होऊ शकतो. पंजाब, हरयाणातून अनेक देशांत अन्नधान्य निर्यात केले जाते. त्यामुळे साहजिकच त्याचा परिणाम होणार आहे. देशाच्या भल्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. यूपीए सरकारनं दिलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. आता खासगीकरण झालं तर होणारा तंटा सोडवणार कोण? असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, असे त्यांनी सांगितले. पालक आणि शिक्षण संस्थाचालक दोघेही अडचणीत आहेत. शुल्कासंदर्भात चर्चा करून तोडगा काढू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
-

 

Web Title: nsk,action,plan,for,corona,vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.