जिल्हा,शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 01:18 PM2020-12-08T13:18:50+5:302020-12-08T13:37:17+5:30

नाशिक : शेतकरी संघनांना पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंहळाची  नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिीत महामंडळाकाडून देण्यात आली. बसेस बंद करण्याच्या बाततीत कोणत्याही सुचना नसल्याने जिल्हा आणि शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.     नव्या कृषी कायदयाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बससेवर कोणताही परिणाम झालेला नाही. दुपारपर्यंत जिल्ह्यातील सर्व बसेस सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची संख्या मात्र कमी असल्याने दुपारनंतर अनेक फऱ्या रद्द करण्याची वेळ आली. सकाळी आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या काही बसेसच्या काचांना जाळ्या लावण्याची दक्षता घेण्यात आली. ...

nsk,all,buses,in,the,district,and,city,run,smoothly | जिल्हा,शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू

जिल्हा,शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देसुरक्षेची दक्षता: बाहेरगावच्या गाड्यांच्या काचांना जाळया

नाशिक: शेतकरी संघनांना पुकारलेल्या भारत बंदच्या काळातही राज्य परिवहन महामंहळाची नाशिक जिल्ह्यातील बससेवा सुरळीत सुरू असल्याची माहिीत महामंडळाकाडून देण्यात आली. बसेस बंद करण्याच्या बाततीत कोणत्याही सुचना नसल्याने जिल्हा आणि शहरातील सर्व बसेस सुरळीत सुरू असल्याचे सांगण्यात आले.

    नव्या कृषी कायदयाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बससेवर कोणताही परिणाम झालेला नाही. दुपारपर्यंत जिल्ह्यातील सर्व बसेस सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची संख्या मात्र कमी असल्याने दुपारनंतर अनेक फऱ्या रद्द करण्याची वेळ आली. सकाळी आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने बाहेरगावी जाणाऱ्या काही बसेसच्या काचांना जाळ्या लावण्याची दक्षता घेण्यात आली.

    जिल्ह्यात तसेच शहरातील सकाळच्या फेऱ्या सुरळीत सुरू होत्या. जिल्ह्यात २० पेक्षा अधिक तर शहरात ४० पेक्षा अधिक बसेस सुरू आहेत. या सर्व बसेस नियमतपणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सेवा असल्याने बसेस बंद करण्यात आलेल्या नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामीण भागात बसस्थानकांवर प्रवाशीच नसल्याने निम्म्या फेऱ्या रद्द करण्याची वेळ आली. बाजारपेठा तसेच बाजार समित्या देखील बंद असल्यानेमुळे त्याचा परिणाम महामंडळाच्या बसेसवर झाला. 

Web Title: nsk,all,buses,in,the,district,and,city,run,smoothly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.