गोवर रुबेला लसीकरणासाठी केंद्राचे पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 04:43 PM2018-11-01T16:43:47+5:302018-11-01T16:45:14+5:30
नाशिक जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरिक्षक त्रीपाठी आणि विभागाती अधिकाऱ्यांनी जिल्हा परिेदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सुचनाही केल्या.
जिल्हा परिषद : मोहिमेची पुर्वतायारी;कामकाजाचा घेतला आढावा
नाशिक: गोवर रुबेरा या आजाराच्या समुळ उच्चाटनासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्यावतीने या महिन्यात शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गोवर रुबेलाचे लसीकरण करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून करण्यात आलेल्या पुर्वतयारीचा आढाव केंद्राच्या पथकाकडून घेतला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात गोवर लसीकरण मोहिमेच्या पुर्वतयारीसाठी केंद्र शासनाचे निरिक्षक त्रीपाठी आणि विभागाती अधिकाऱ्यांनी जिल्हा परिेदेच्या आरोग्य विभागात लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी त्यांनी अनेक सुचनाही केल्या. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात ‘गोवर रूबेला लसीकरण मोहीम २०१८’ नोव्हेंबर पासून पुढील पाच आठवडे जिल्हात तसेच महानगरपालिका , नगरपालिका क्षेत्रात राबविली जाणार आहे .या साठीची पूर्वतयारी जाणून घेण्यासाठक्ष केंद्राचे पथक नाशिकला आले आहे. पथकाने शिक्षण विभाग, आरोग्य विभाग ,महिला बालकल्याण विभाग, या विभागाने आजपर्यंत केलेल्या कामांयाविषयी जिल्हास्तरावर भेट देऊन माहिती घेतली. यामध्ये जिल्हास्तरावरील टास्क फोर्स मीटिंग, अधिकारी व कर्मचाºयांच्या कार्यशाळा आणि सुक्ष्म कृती आराखड्याबाबत माहिती घेतली.