रमाबाई आंबेडकर वसतीगृहाचा होणार कायापालट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 06:01 PM2018-12-06T18:01:15+5:302018-12-06T18:02:30+5:30
नाशिक : नेहरू उद्यानसमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतीगृह हा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वास्तुचा ...
नाशिक: नेहरू उद्यानसमोरील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थीनी वसतीगृह हा ऐतिहासिक वारसा असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वास्तुचा भूमीपूजन सोहळा झालेला आहे. त्यामुळे या वस्तुचे जतन व्हावे यासाठी शासनाने या वास्तुच्या नुतणीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी दिली. या कामाच्या लवकरच निविदा निघणार असल्याचेही फरांदे यांनी यावेळी सांगितले.
शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नेहरू उद्यानासमोरच विद्यार्थीनी वसतीगृह असून या वसतीगृहाच्या माध्यमातून समाजातील मुलींना सन्माने निवास आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. अनेक मुली या वसतीगृहातून घडलेल्या आहेत. गेली अनेक वर्ष ही वास्तू तशीच असून विद्यार्थीनींची संख्या मात्र वाढत गेली आहे. त्यामुळे वसतीगृह अपुरे देखील पडत होते. सोयीसुविधा पुरविण्यासही अनेक अडचणी येत असल्यामुळे या वसतीगृहाच्या नुतणीकरणाची नेहमीच मागणी केली जात होती. त्यामुळे तातडीने प्रस्ताव करून तो शासनाकडे पाठविण्यात आला आणि पाठपुरावा करून वसतीगृहाच्या नुतणीकरणासाठी शासनाकडून पाच कोटी मंजूर झाले असे फरांदे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी वसतीगृहाच्या अध्यक्ष सुमन कर्डक, कॅप्टन कुणाल वाघ, माजी महापौर अशोक दिवे, नगरसेवक सुषमा पगारे, पी.के. गायकवाड, सुहास फरांदे, रमेश गायकवाड, अभय गायकवाड, सुधीर गायकवाड, सुमन गायकवाड, बेबी डेर्ले, संजय गायकवाड, आदि उपस्थित होते. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेले वसतीगृह आणि या वास्तुचे भूमीपूजन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यामुळे ही एक ऐतिहासिक वास्तू असल्यामुळे शासनाच्या अनुसूचित जात आणि नवबौद्ध घटकांसाठी ऐतिहासिक व सांस्कृतिकदृट्या महत्वाच्या असणाऱ्या स्थळांचा विकास करण्याच्या धोरणातून वसतीगृहाचे नुतणीकरण होणार असल्याचे फरांदे यांनी सांगितले.