मुख्य कार्यकारी अधिकारी गीते यांचा कर्मचाऱ्यांतर्फे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 08:14 PM2018-08-02T20:14:33+5:302018-08-02T20:19:23+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बरोबरच महत्वाच्या अनेक प्रश्नांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेचे जिल्हा परिषद कर्मचाºयांनी स्वागत केले असून त्यांचा कर्मचाºयांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांनी कामकाजाची अंतर्गत सुधारणा करण्याबरोबरच कर्मचारी, अधिकाºयांच्या पदोन्नती संदर्भात घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.
डॉ. गिते यांनी जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण भागात विविध विकास काम प्रभावीपणे राबवीत असतानाच अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा धडाका लावला आहे. कालबद्ध पदोन्नती, नियमित पदोन्नती, सेवापुस्तके संगणीकृत करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करणे आदि प्रश्न मार्गी लावले आहेत. नुकतेच आरोग्य विभागातील १२ व २४ वर्ष झालेल्या औषधनिर्माण अधिकाºयांना कालबद्ध पदोन्नती देण्यात आली आहे. कर्मचाºयांच्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न मार्गी लावल्याबाबत महाराष्ट्र औषधनिर्माण अधिकारी संघटनेचे अध्यक्ष फैय्याज खान, सरचिटणीस सचिन अत्रे, उपाध्यक्ष तुषार पगारे, कार्याध्यक्ष विजय देवरे, सल्लागार जी.पी. खैरनार, राजेश शिरसाठ यांच्या हस्ते डॉ गिते यांचे देवून अभिनंदन करण्यात आले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . विजय डेकाटे, सहायक प्रशासन अधिकारी जिभाऊ शेवाळे उपस्थित होते.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने कनिष्ठ सहायक व वरिष्ठ सहायक यांना पदोन्नती दिल्याबाबत डॉ. गिते यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी संघटनेचे मुख्य सचिव बापूसाहेब कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.