भाजपावर टीका करणाऱ्या सेना नगरसेवकावर वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 07:59 PM2018-11-15T19:59:01+5:302018-11-15T20:00:11+5:30
नाशिक : अयोध्येत राममंदिराचे बांधकाम तर नाहीच शिवाय शहरातील मंदिरे पाडल्यास भाजपाच्या कोणत्याही उमेदवाराने मत मागण्यास येऊ नये ही ...
नाशिक : अयोध्येत राममंदिराचे बांधकाम तर नाहीच शिवाय शहरातील मंदिरे पाडल्यास भाजपाच्या कोणत्याही उमेदवाराने मत मागण्यास येऊ नये ही नाशिकरोड येथील नगरसेवक यांची टीका भाजपाला झोंबली असून, हा फलक तर महापालिकेने काढून नेलाच, शिवाय ढगे यांच्या निवासस्थानाकडे जाण्याबाबत असलेले दिशादर्शक फलक गुरुवारी (दि.१५) तातडीने हटविले.
शहरातील सुमारे ५७५ बेकायदा धार्मिक स्थळे महापालिका प्रशासन हटविणार आहे. सदरची धार्मिक स्थळे केवळ २००९ पूर्वी असल्याचा पुरावा नाही म्हणून हटविण्यात येत असल्याने शहरात नाराजीचे वातावरण आहे. २००९ नंतरची खुल्या जागेत बांधलेली ७२ धार्मिक स्थळे असून, ती हटविण्याबाबतदेखील कार्यवाहदेखील होणार आहे तूर्तास न्यायालयाच्या आदेशामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असले तरी गेल्या दोन महिन्यांत हा विषय शहरात खूपच गाजला होता. महापालिकेत आणि राज्यात इतकेच नव्हे दर देशात भाजपाची सत्ता असतानादेखील मंदिरे हटविली जात असल्याने नाशिकरोड येथील प्रभाग क्रमांक १७ मधील शिवसेना नगरसेवक यांनी मंदिर पाडल्यास भाजपाच्या कुठल्याही उमेदवाराने भविष्यात मदत मागण्यास येऊ नये अशाप्रकारचा फलक लावला होता. त्यामुळे संतप्त भाजपा पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला सांगून हा फलक हटविला. आता त्यापुढे जाऊन महापालिका प्रशासनाने ढगे यांच्या निवासस्थानी असलेला निवासस्थानाकडे जाणारा दिशादर्शक फलकच हटविला आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे आहेत, फलक आणि राजकीय फलकदेखील आहेत. मात्र ते हटविण्याचे सोडून केवळ एका अधिकृत नगरसेवकाच्या घराबाबत आणि तेही महापालिकेनेच लावलेले दोन दिशादर्शक फलक काढून घेण्याचे कारण काय? असा प्रश्न ढगे यांनी केला आहे.