३० हजार ग्राहक महावितरणला स्वत: पाठवितात मीटर रीडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 03:31 PM2021-06-03T15:31:15+5:302021-06-03T15:36:24+5:30
कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून सरासरी वीजबिले ग्राहकांना पाठविली जात आहेत. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे
नाशिक : कोरोनामुळे महावितरणकडून मीटर रीडिंग घेतले जात नसल्याने ग्राहकांनी आपल्या वीज मीटरचे रीडिंग स्वत: महावितरणला पाठवावे, असे आवाहन करीत ऑनलाईन यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून नाशिक परिमंडलातील सुमारे ३० हजार ग्राहक महावितरणला आपले स्वत:चे वीज मीटर रीडिंग ऑनलाईन पाठवित आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात आठ हजार ग्राहक ऑनलाईन आले आहेत.
कोरोना संसर्गाच्या कालावधीत प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता महावितरणकडून सरासरी वीजबिले ग्राहकांना पाठविली जात आहेत. ग्राहकांना अचूक वीजबिल मिळावे यासाठी महावितरणने ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने मीटर रीडिंग पाठविण्याचे आवाहन केले आहे. महावितरणने दिलेल्या सुविधांचा वापर करीत स्वतःहून मीटरचे रीडिंग पाठविण्यास महावितरणच्या वीज ग्राहकांकडून दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नाशिक परिमंडलात गेल्या एप्रिल महिन्यात २२,३३० ग्राहकांनी मोबाईल ॲप, वेबसाईट व ह्यएसएमएसह्णद्वारे मीटरचे रीडिंग महावितरणकडे पाठविले होते, तर मे महिन्यात यामध्ये आठ हजारांनी वाढ होऊन रीडिंग पाठविण्यामध्ये नाशिक परिमंडलातील ३०,१४२ वीज ग्राहकांचा समावेश झाला आहे.
वीजग्राहकांना विविध प्रकारे स्वतःहून मीटर रिडींग पाठविण्याची सोय महावितरणने उपलब्ध करून दिली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या आपत्कालीन परिस्थितीत आता मोबाईल ह्यएसएमएसह्णद्वारे देखील मीटर रिडींग पाठविण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.