सायकल पोलो स्पर्धेत नागपूर, बुलढाण्याचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 06:55 PM2018-10-15T18:55:26+5:302018-10-15T18:57:36+5:30
नाशिक : सायकलवरील वर्चस्व आणि एका हाताने चेंडूवर नियंत्रण मिळवून पायाने सायकलच्या पॅन्डलने गतीने गोलपोस्टकडे चेंडू घेऊन जाणाऱ्या अत्यंत ...
नाशिक : सायकलवरील वर्चस्व आणि एका हाताने चेंडूवर नियंत्रण मिळवून पायाने सायकलच्या पॅन्डलने गतीने गोलपोस्टकडे चेंडू घेऊन जाणाऱ्या अत्यंत आगळ्यावेगळ्या अशा सायकल पोलो स्पर्धेत नागपूर आणि बुलढाणा संघाने वर्चस्व राखले आहे.
नाशिक जिल्हा सायकल पोलो असोसिएशन आणि क्र ीडा साधना, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र सायकल पोलो असोसिएशन यांच्या मान्यतेन येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य सायकल पोलो अजिंकपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या आजच्या दुसºया दिवशी सब ज्युनियर मुलांच्या स्पर्धेत वर्धा संघाने ठाण्याचा पराभव केला, तर तर यजमान नाशिकने नागपूरचा पराभव करून चांगली कामिगरी केली. मुलांच्या ज्युनियर गटात बुलढाणा संघाने नाशिकचा पराभव केला, तर अकोला संघाने सहज नागपूरचा पराभव करून आपली विजयी मालिका सुरु केली. वरिष्ठ गट पुरु षांच्या गटात नागपूरने वर्धाच्या ९-० असा सहज पराभव करून मोठा विजय साजरा केला. गोंदिया संघाने कालप्रमाणे जोमाने खेळ करून यजमान नाशिकचा ९ विरु द्ध ० असा पराभव करून आपली विजयी मालिका पुढे सुरु ठेवली. बुलढाणा संघाने अहमदनगरचा पराभव करून विजय प्राप्त केला.
नागपूर संघाने आपल्या तिसºया सामन्यात ठाणे संघाचा पराभव करून तिसरा विजय साजरा केला. या स्पर्धेला जल्हा क्र ीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी भेट दिली. याप्रसंगी राज्य सचिव गजानन बुरु डे, पांडुरंग गुरव, अविनाश वाघ, अशोक दुधारे, आनंद खरे , नितीन हिंगमिरे आदी उपस्थित होते.
मंगळवार दि. १६ रोजी सायंकाळी ४ वाजता स्पर्धेची सांगता होणार आहे अशी माहिती नितीन हिंगमिरे यांनी दिली. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डी. दीपक निकम , अविनाश वाघ, मयूर गुरंव, पांडुरंग गुरव आदी प्रयत्नशील आहेत.
निकाल
सब ज्युनियर मुले
१) वर्धा विजय विरु द्ध ठाणे (८-०)
२) नाशिक विजय विरु द्ध नागपूर (२-०)
ज्युनियर मुले
३) बुलढाणा विजय विरु द्ध नाशिक (४-३)
४) अकोला विजय विरु द्ध नागपूर (६-१)
पुरु ष गट
१) गोंदिया विजयी विरु द्ध नाशिक ९-०
२) नागपूर विजय विरु द्ध वर्धा ९-०
३) बुलढाणा विजय विरु द्ध अहमदनगर (१७-०)
४) नागपूर विजय विरु द्ध ठाणे (१४-०)