जिल्हा परिषद कंत्राटी वाहनचालकांचे वेतन थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:53 PM2018-11-16T17:53:14+5:302018-11-16T17:54:21+5:30
नाशिक : जिल्हा परिषदेतील जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन ...
नाशिक : जिल्हा परिषदेतील जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम अभियाना अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन त्वरित देण्यात यावे तसेच कनिष्ठ सहायक लिपिकावर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांना दिले.
मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी शासनाकडून जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. गरोदर मातेस व एक वर्षाखालील आजारी बालकास घरापासून रुग्णालयापर्यंत तसेच रुग्णालयापासून घरापर्यंत मोफत वाहतूक सेवा या जननी शिशु सुरक्षा कार्यक्र म अंतर्गत राबविली जाते. नाशिक जिल्ह्यातील जवळपास ६४ वाहनचालक हे जननी शिशु सुरक्षा कार्यक्र माअंतर्गत कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. परंतु त्यांना गेल्या तीन महिन्यांपासून मोबदला मिळालेला नाही. भोपाळच्या मे. अशकोम मेडिया इंडिया प्रा.लि., या कंपनीकडे वाहनचालक पुरविण्याचे कंत्राट असून आॅगस्ट महिन्यापासून वाहनचालकांना त्यांचे वेतन मिळालेले नाही. कामगारांच्या पगाराची तजवीज करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी पार न पाडल्याने वाहनचालकांची दिवाळीही अंधारातच गेली. दिवाळीत तरी वेतन मिळावे याकरिता वाहनचालक जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक लिपिक अंबादास पाटील यांच्याकडे आपले गाºहाणे मांडण्यास गेले होते; परंतु त्यांनी वाहनचालकांना अवमानकारक वागणूक दिल्याचा आरोप चालकांनी केला आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत राष्ट्रवादी माथाडी व जनरल कामगार युनियनचे जिल्हाध्यक्ष शिवराज ओबेरॉय यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांना वाहनचालकांचे तीन महिन्यांपासून प्रलंबित असलेले वेतन देण्यात यावे व कनिष्ठ सहायक लिपिक पाटील यांच्यावर योग्य कारवाई करावी, असे निवेदन दिले. मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.