बिटको, सिव्हीलसह तालुकास्तरावर पोस्ट कोविड सेंटरचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 05:35 PM2020-12-06T17:35:39+5:302020-12-06T17:36:51+5:30
कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
नाशिक : जिल्ह्यात बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रूग्णालय आणि ग्रामीण भागात तालुकास्तरावर पोस्ट कोविड सेंटर सुरु करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कोविडपश्चात रुग्णांची काळजीदेखील घेतली जाईल. मात्र, त्याचबरोबर आता कोरोनाला गांभिर्याने घेण्याची गरज असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
कोरोना बरा झाल्यानंतरही रुग्ण पुन्हा कोरोना बाधित होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात तात्काळ पोस्ट कोविड सेंटर महानगरपालिका क्षेत्रातील बिटको हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय व ग्रामीण भागात प्रत्येक तालुकास्तरावर सुरू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या पोस्ट कोविड सेंटरच्या माध्यमातून कोविडमधून बरे झाल्यानंतर देखील रुग्णांनी काय काळजी घेण्यात यावी, याबाबत आरोग्य यंत्रणेने नागरिकांमध्ये प्रचार व प्रसिद्धी करावी ज्यामुळे कोविडबाधित आणि कोविडमधून बरे झाल्यानंतरच्या रूग्णांमधील वाढीला वेळीच नियंत्रणात आणणे शक्य होईल, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.