मेगा भरतीसाठी आदिवासींचे परीक्षा शुल्क कमी करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 04:29 PM2019-01-08T16:29:35+5:302019-01-08T16:31:27+5:30
नाशिक : आदिवासी विकास विभाग मार्फत होत असलेल्या शिक्षक भरती व इतर पदभरती चे शुल्क हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ७५० ...
नाशिक : आदिवासी विकास विभाग मार्फत होत असलेल्या शिक्षक भरती व इतर पदभरती चे शुल्क हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ७५० रुपये तर इतर विद्यार्थ्यांसाठी ८५० रूपये इतके आहे. महाराष्ट्र शासन घेत असलेल्या एमपीएस्सीचे शुल्क बघितले तर ३५० इतके आहे व ते इतर इतर विभागाच्या मेगा भरतीच्या निम्मे हे शुल्क आहे. त्यामुळे आदिवासी विकास विभाग विद्यार्थ्यांवर एक प्रकारे अन्याय करत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. मागील आदिवासी विकास विभाग ती भरती प्रक्रियेला स्थगिती आल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले अशा विद्यार्थ्यांना या मेगा भरती आदिवासी विकास विभाग च्या कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारणी करण्यात येऊ नये अशी देखील मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यचे नविनर्वाचित युवा कार्यध्यक्ष गणेश भाऊ गवळी यांनी निवेदन दिले आहे. याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख वसतिगृह विभाग भानुदास खोटरे, नाशिक शहर युवा उपाध्यक्ष हेमंत पवार, युवा सरचिटणीस भूषण चहाळे , सुरेश जाधव, सुनील फसाळे, ओमकार तीरे, धीरज ढगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते