जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांवरील नाराजी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 03:01 PM2018-10-15T15:01:17+5:302018-10-15T15:01:33+5:30
जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या वर दडपशाहीचा आरोप केला आहे. कामाच्या ताणामुळेच एका आरोग्य सेवकाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. दरम्यान, कर्मचाºयांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन सादर केले.
नाशिक: जिल्हा परिषदेच्या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यावर कामाचा अतिरिक्त ताण असल्याने कर्मचारी प्रचंड मानसिक दडपणात असल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्या वर दडपशाहीचा आरोप केला आहे. कामाच्या ताणामुळेच एका आरोग्य सेवकाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेसमोर निदर्शने केली. दरम्यान, कर्मचाºयांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत मागण्यांचे निवेदन सादर केले.
जिल्हा परिषदेचे आरोग्य सेवा कर्मचारी कौतिक बाबुराव अहिरे यांनी कामाच्या तणावामुळे आत्महत्या केल्याचा अहिरे यांच्या कुटूंबियांना आणि कर्मचारी संघटनेचा देखील आरोप असून याप्रकरणाची चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी देकाटे यांनी जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा बोजा दिला आहेच शिवाय सातत्याने माहिती मागविणे, बैठका, मिटींगा घेणे, एकसारखी माहिती नेमहीच मागणे या कामांमुळे कर्मचाºयांवरील ताण वाढल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. शंभर कर्मचाऱ्यावर अकार्यक्षमतेचा ठपक ठेवत त्यांना कार्यमुक्त करण्याचे दिलेले आदेश, तीन कर्मचाºयांवरील निलंबन आणि जाचक जॉब चार्ट यामुळे आरोग्य सेवा कर्मचारी प्रचंड तणावात असल्याचे संघटनेने पत्रकात म्हटले अ ाहे.