जिल्हा मानांकन टेबलटेनिस स्पर्धेचा समारोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:00 PM2018-10-26T14:00:13+5:302018-10-26T14:01:43+5:30
नाशिक न्यूज नेटवर्क नाशिक : नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या जुनिअर मुलांच्या गटात ...
नाशिक न्यूज नेटवर्क
नाशिक: नासिक जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेच्या जुनिअर मुलांच्या गटात अंतिम फेरीत विराज कोटेचा ने सुधांशु वाणीचा अटीतटीच्या लढतीत १०-१२, ११-६, ९-११, ९-११, ११-८ व ९-११ असा ४-२ ने पराभव करत विजय प्राप्त केला. तर युथ मुलांच्या गटात सौमति देशपांडे याने अर्चित भडकमकरचा ११-१, ११-१, ११-७, ९-११, ९-११ व ११-७ असा ४-२ ने सहजरित्या पराभव करत विजेतेपद पटकावले.
सब जुनिअर मुलांच्या गटात कुशल चोपडा ने लोवीत चांदूरकरचा ९-११, १२-१०, ११-९, ११-६, व ११-४ असा ४-१ ने पराभव केला. तर कॅडेट मुलाच्या गटात कुशल चोपडा याने आर्यन पोळ याचा ११-५, ११-५, ११-४ असा ३-०ने असा सहजरित्या पराभव करून आपली विजयी घोडदौड सुरु ठेवली.
तर सब जुनिअर मुलींच्या एकेरीत तनिषा कोटेचा हिने सायली वाणीचा १३-११,३-११.११-७,११-६, व १२-१० असा ४-२ ने असा पराभव करत अजिंक्यपद मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले. पुरु षांच्या एकेरीत मानांकित पुनीत देसाई याने आपल्या अनुभवाच्या बळावर अिर्चत भडकमकर याचा ४-१ ने सहजरित्या पराभव करत विजय संपादन केला.
कॅडेट मुलींच्या गटात सायली बक्षी हिने मतिाली पुरकर हीचा ११-९,८-११,८-११,११-३, व ११-५ असा ३-२ ने पराभव केला.
स्पर्धेतील विजयी खेळाडूंना प्रमुख पाहुणे सर्व शिवछत्रपती पुरस्कार विजेते मा. श्री. आनंद खरे, मा. श्री. अशोक दुधारे व मा. श्री. गोरखनाथ बलकवडे यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिक देवून गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्र मा प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्र मांचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव शेखर भंडारी यांनी केले. या प्रसंगी व्यासपीठावर राजेश भरवीरकर आदी उपस्थित होते. या प्रसंगी अभिषेक छाजेड, जय मोडक, पियुष चोपडा, अजिंक्य शिंत्रे, पुरु षोत्तम आहेर आदि मान्यवर खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.