ई-फेरफार प्रणालीत नंदुरबार राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2021 06:18 PM2021-03-03T18:18:41+5:302021-03-03T18:19:57+5:30
नाशिक : महसूल विभागाशी निगडीत नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं ...
नाशिक: महसूल विभागाशी निगडीत नोंदणीकृत तसेच अनोंदणीकृत प्रलंबित असलेल्या फेरफार नमुन्यात जमिनीची खरेदी-विक्री, वारस नोंदी, शेतजमिनीवर बोजा लावणं अशा
ई-फेरफारमध्ये नाशिक विभागाने राज्यात अव्वल कामगिरी केली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्याने या कामगिरीत प्रथम क्रमांक मिळविला असून विभागातील पाचही जिल्यांची कामगिरी पहिल्या पाच मध्ये राहिली आहे. महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित अनोंदणीकृत व नोंदणीकृत फेरफार यांची प्रलंबितता कमी करण्याबाबत नाशिक विभागात उल्लेखनीय कामकाज झाले असून नाशिक विभागातील नंदुरबार, अहमदनगर, जळगाव,धुळे, व नाशिक हे जिल्हे अनुक्रमे राज्यात एक ते पाच स्थानी आले आहेत. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली.
ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा नियमित घेण्यात आलेला आहे. नाशिक विभागातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी राज्यात ई-फेरफार प्रणालीमध्ये प्रलंबित फेरफार यांची प्रलंबितता कमी करून विभागातील जनतेला दिलासा देणारे कामकाज केले आहे. असे गमे यांनी यावेळी सांगितेल.