३३ वर्षानंतर नाशिकमध्ये रंगणार राज्य अजिंक्यपद कबड्डीचा थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 05:56 PM2018-10-15T17:56:43+5:302018-10-15T17:57:30+5:30
१९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर नाशिक जिल्ह्यात तब्बल ३३ वर्षानंतर वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामांकीत खेळाडू सहभागी होणार असून यातूनच राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
नाशिक : १९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर नाशिक जिल्ह्यात तब्बल ३३ वर्षानंतर वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत नामांकीत खेळाडू सहभागी होणार असून यातूनच राज्याच्या संघाची निवड करण्यात येणार आहे.
महाराष्टÑ राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने, नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सिन्नरच्या सह्याद्री युवा मंचच्यावतीने सिन्नरमध्ये ६६ व्या वरिष्ठ पुरूष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत सिन्नर येथील आडवा फाटा मैदानावर या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे व सह्याद्री युवा मंचचे अध्यक्ष उदय सांगळे यांनी दिली.
या स्पर्धेज राज्यातील महिलांचे आणि पुरूषांचे प्रत्येकी २५ संघ सहभागी होणार असून सुमारे ६०० खेळाडूंच्या सहभागाने स्पर्धेची चुरस वाढणार आहे. ५० प्रशिक्षक, ५० संघ व्यवस्थापक, १०० पंच, विविध जिल्ह्यातील संघटनांचे व राज्य संघटनेचे १०० पदाधिकारी तसेच १०० स्वयंसेवक असे एकुण १००० व्यक्त या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
सिन्नर येथे कबड्डीची आधुनिक क्रीडानगरी उभारण्यात येणार आहे. या नगरीत ८००० क्षमतेची प्रेक्षक गॅलरी उभरण्यात येणार आहे. सहा मैदानांवर सायंकाळी प्रकाशझोतात सामने खेळविण्यात येणार असून प्रथम साखळी तर नंतर बाद पद्धतीने सामने खेळविले जाणार आहेत.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, समाजकल्याण सभापती सुनीता चारोस्कर, माजी आमदार जयंत जाधव, सह्याद्री मंडळाचे उदय सांगळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड आदि उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रशांत भाबड यांनी केले.
--इन्फो--
या अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत राष्टÑीय, आंतरराष्टÑीय तथा प्रो-कबड्डी लीगमध्ये खेळले नामांकीत खेळाडू सहभागी होणार असून नाशिक जिल्ह्यातील कबड्डीप्रमींना या आंतरराष्टÑीय खेळाडंूचा खेळ पाहाण्याची संधी मिळणार आहे.