नाशिकरोडच्या मनपा शाळेत नेदरलॅन्डचे हॉकीपटू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 05:47 PM2018-07-06T17:47:55+5:302018-07-06T17:53:46+5:30
नेदरलॅन्डच्या या हॉकी खेळाडूंचे शाळेत आगमन झाले. जिल्ह्याच्यावतीने शाळेने पारंपरिक पद्धतीेने स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी त्यांचे औक्षण करून त्यांना फुलांचा हार घातला. पाहुण्यांच्या पुढे शाळेचे वाद्यपथक आणि लेझीमचे विद्यार्थी होते. हा पाहुणचार पाहून नेदरलॅन्डचे खेळाडूही भरावले. त्यांनी तोंडभरून स्वागताचे कौतुक केले.
नाशिक: नाशिकरोड जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ मध्ये नेदरलॅन्ड संघाचे आंतरराष्ट्रीय हॉकीपटू दाखल झाले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हॉकी लीगच्या प्रचारप्रसारासाठी नेदरलॅन्डचे खेळाडू सध्या भारताच्या दौऱ्यावर असून ते सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांशी हॉकी विषयी संवाद साधत आहेत.
हॉकी खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी एका खासगी संस्थेच्या ‘वन मिलीयन हॉकी लीग’ अभियान सुरू करण्यात आले आहे. या अभियानात नाशिक शहर आणि परिसरातील काही महपालिका शाळांची निवड करण्यात आली आहे. या शाळांना नेदरलॅन्डचे आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू निकोलेस डेन आॅडीन व जोप वॅन रिनन भेट देत आहेत. शुक्रवारी त्यांनी नाशिकरोड जेलरोड येथील मनपा शाळा क्रमांक ५६ येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सरकारी शाळांमध्ये हॉकीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांना मोफत हॉकी प्रशिक्षण आणि हॉकी खेळाचे साहित्य वाटप केले जाणार आहे. याच शाळांमधून काही गुणवंत विद्यार्थ्यांना राज्य व राष्टÑीय पातळीवर स्पर्धेसाठी तयार करण्याची ही योजना आहे. ा महिंद्रा अॅग्रो सोल्युशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.
सकाळी ९ वाजता नेदरलॅन्डच्या या हॉकी खेळाडूंचे शाळेत आगमन झाले. जिल्ह्याच्यावतीने शाळेने पारंपरिक पद्धतीेने स्वागत करण्यात आले. शिक्षिकांनी त्यांचे औक्षण करून त्यांना फुलांचा हार घातला. पाहुण्यांच्या पुढे शाळेचे वाद्यपथक आणि लेझीमचे विद्यार्थी होते. हा पाहुणचार पाहून नेदरलॅन्डचे खेळाडूही भरावले. त्यांनी तोंडभरून स्वागताचे कौतुक केले.
नगरसेवक संभाजी मोरूस्कर, अंबादास पगारे, डॉ. सीमा ताजणे, प्रशासन अधिकारी नितीन उपासनी, केंद्रप्रमुख राजश्री गांगुर्डे आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. यो दोन्ही खेळाडूंचे फेटा बांधून पारंपरिक महाराष्ट्रीयन संस्कृतीप्रमाणे स्वागत करण्यात आले. शिक्षक मंगेश पाठक, नरेंद्र पवार यांनी स्वागत गीत म्हटले.