पंचवटी एक्सप्रेस डिस्कब्रेकला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 01:48 PM2021-03-22T13:48:08+5:302021-03-22T13:49:18+5:30
नाशिक : मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डिस्क ब्रेकने कसारा नजिक अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अग्निरोधकच्या साह्याने तत्काळ आग ...
नाशिक: मनमाड-मुंबई पंचवटी एक्सप्रेसच्या डिस्क ब्रेकने कसारा नजिक अचानक पेट घेतल्याने प्रवाशांची धावपळ उडाली. अग्निरोधकच्या साह्याने तत्काळ आग विझविण्यात आल्याने अनर्थ टळला. रेल्वेच्या तांत्रिक सल्लागरांनी गाडी सुस्थितीत असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर गाडी मुंबईकडे रवाना करण्यात आली. त्यामुळे गाडी अध्य'ा तासाने उशीरा मुंबईत पोहचली.
मनमाडहून नाशिकरोडला निर्धारीत वेळत पोहचलेली पंचवटी एक्सप्रेस कसाऱ्याजवळील उंबरवाडी येथे आली असता बोगी क्रमांक डी-११ येथील चाकातून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागल्याने जागरूक प्रवाशांनी तत्काळी चैन ओढून गाडी थांबविली. याबाबतची माहिती गाडीचे चालक आणि गार्डला देण्यात आल्यानंतर ते बोगीजवळ दाखल झाले. तो पर्यंत चाकाच्या डिस्कब्रेकने पेट घेतल्याने सर्वांची धावपळ झाली. प्रवाशांनी आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्यांनी आग विझविण्याचा प्रयत्नही केला. नियमित प्रवासी सुलतान काझी शेख, रोहित वानखेडे, प्रा. विवेक पाटील तसेच देविदास पंडीत यांनी नागरिकांकडून पाण्याच्या बाटल्या घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. तरीही आग आणि धूर सुरूच होता. प्रवाशांनी धावपळ न करण्याच्या सुचना देत त्यांना सुरक्षित एका बाजूला केले.
गार्ड तसेच चालकांनी गाडीतील अग्निरोधक यंत्राच्या साह्याने आगीवर नियंत्रण मिळविले. संपुर्ण गाडीची पाहाणी करण्यात आल्यानंतर गार्डने तांत्रिक सल्लागारांशी चर्चाा केल्यानंतर आर्धा तासाने गाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली. दरम्यान, डिस्कब्रेकला लागलेल्या आगीनंतर प्रवाशांनी संयम दाखविल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. पंचवटी प्रवासी संघटनेच्या कार्यकत्य'ांची भूमिका महत्वपुर्ण ठरली.