जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहिम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 05:14 PM2019-01-11T17:14:28+5:302019-01-11T17:18:18+5:30

नाशिक :  पुढील महिन्यात म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय ...

nsk,pulse,polio,campaign ,february,district | जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहिम

जिल्ह्यात ३ फेब्रुवारी रोजी पल्स पोलिओ मोहिम

Next
ठळक मुद्दे ८११० आरोग्य कार्यकर्त्यांमार्फत मुलांना लस देण्यात येणार


नाशिक:  पुढील महिन्यात म्हणजेच ३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत नियोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्ेया या बैठकीत गोवर रूबेला लसीकरण मोहीमेबाबत चर्चा करण्यात आली. तसेच योत्या ३ फेब्रुवारी रोजी राबविण्यात येणा-या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरणाबाबत नियोजन करण्यात आले. ग्रामीण स्तरावर ४ लक्ष १३ हजार ७६ एवढया अपेक्षित लाभार्थ्यांसाठी ३१७१ बूथ उभारण्यात येणार असून त्या ठिकाणी ८११० आरोग्य कार्यकर्त्यांमार्फत मुलांना लस देण्यात येणार आहे. तसेच ६३६ अधिकारी व कर्मचारी या मोहिमेवर लक्ष ठेवून असणार आहेत. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश जगदाळे जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.रवींद्र चौधरी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दावल साळवे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ.शैलेश निकम, डॉ.अनंत पवार, जिल्हा बालरोगतज्ञ डॉ.पंकज गाजरे आदि उपस्थित होते.
 

Web Title: nsk,pulse,polio,campaign ,february,district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.