एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५ वर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:37 PM2019-04-17T15:37:07+5:302019-04-17T15:37:57+5:30

एकलहरे : शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ...

nsk,senior,citizens,ar,still,65,years,old | एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५ वर्ष

एसटीला ज्येष्ठ नागरिकांचे वय अजूनही ६५ वर्ष

Next
ठळक मुद्देज्येष्ठ वंचित : ६० वर्षांवरील नागरिक लाभापासून वंचित


एकलहरे : शासनाकडून ६० वर्ष वयाच्या व्यक्तीला ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र दिले जाते. मात्र एसटी बसमध्ये तिकिटावरील ५० टक्केसवलत घेण्यासाठी ६५ वयाची अट असल्याने ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र असूनही त्यांना लाभ मिळत नसल्याने ज्येष्ठांमध्ये काहीशी नाराजी आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये प्रवासी सवलत मिळविण्यासाठी वयाच्या अटीवरून अनेक मतप्रवाह आहे. काही वाहक ६० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांना सवलत देतात, तर काही वाहक ६५ वर्षांची अट घालतात. याबरोबरच ज्येष्ठ नागरिक म्हणून असलेल्या ओळखपत्राच्या सतत्येबाबतही वाहकांकडून विचारणा होत असल्याने अनेकदा ओळखपत्रामधील वय आणि फोटोतील चेहरा यावरून वयाचा अंदाज लावून प्रवासाची सवलत नाकारली जात असल्याचेही प्रकार घडतात. काही ज्येष्ठ नागरिक ६० वर्ष असल्याने सवलतीसाठी आडून बसतात. शासनाकडून मिळालेल्या ओळखपत्राबाबतही अनेकदा प्रवासी आणि वाहकांमध्ये वाद होतात.
एस. टी. बसने प्रवास करताना अजूनही ६५ वर्षे वय लागते असे अनेकदा वाहकाकडून सांगितले जाते. एवढेच नाही तर बसस्थानकात विनावाहक-विनाथांबा बससाठी आगाऊ तिकीट बुकिंगसाठीही असाच अनुभव येतो.
—इन्फो—
गोंधळाची परिस्थिती कायम
ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक उन्नती, ताणतणावातून मुक्त, उत्तम आरोग्यासाठी सामाजिक न्याय आणि विषेश सहाय्य विभागाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले असून, त्याच्या अंमलबजावणीसाठी संबंधित सर्व विभागांना सक्तीचे निर्देश दिले आहेत. सर्व प्रकारच्या लाभासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची मर्यादा ६५ वरून ६० वर्षे करण्यात आली असल्याची घोषणा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी जुलै २०१८ मध्ये केली होती.

Web Title: nsk,senior,citizens,ar,still,65,years,old

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.