रणजी सामन्यासाठी मंडप उभारणी कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 05:12 PM2018-12-04T17:12:12+5:302018-12-04T17:13:05+5:30
नाशिक : नाशिक येथे होणाºया महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र रणजी सामन्यासाठी मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला असून तत्पूर्वी जिल्हाधिकारी ...
नाशिक: नाशिक येथे होणाºया महाराष्ट्र विरु द्ध सौराष्ट्र रणजी सामन्यासाठी मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ झाला असून तत्पूर्वी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या हस्ते या कामाचे भूमीपुजन करण्यात आले.
बीसीसीआयच्या वतीने घेण्यात येणाºया रणजी स्पर्धेतील महाराष्ट्रात होणाºया पाच सामन्यांपैकी एक सामना महाराष्ट्र विरूद्ध सौराष्ट्र गोल्फ क्लब मैदान येथे हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर १४ ते १७ डिसेंबर दरम्यान होणार आहे. यासाठी खेळाडूंसाठी व प्रेक्षकांना बसण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी मंडप उभारणी कामाचे भूमिपूजन जिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष राधाकृष्णन बी. यांच्या हस्ते सकाळी करण्यात आले. यावेळी चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे, योगेश हिरे, हेमंत देशपांडे, आनंद शेट्टी, शिवाजी उगले, निखिल टिपरी, सतीश गायकवाड, रतन कुईटे, बाळू मंडलिक, राजू आहेर, संदीप सेनभक्त हे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी यांनी मैदानाची तयारी, दोन्ही संघाचे राहण्याची व्यवस्था, भारतीय संघात प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आदिंबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे रणजी सामन्याच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आवश्यक सूचना केल्या. नाशिक जिल्हा क्रि केट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.