भुजबळ नॉलेज सिटीच्या मेट बीकेसी उत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 07:27 PM2019-01-16T19:27:27+5:302019-01-16T19:28:27+5:30
नाशिक : भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात पारंपरिक वेशभुषेत सजलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी सांस्कृतिक भारताचे दर्शन घडवित आधुनिकतेतही परंपरेची जाणीव ...
नाशिक: भुजबळ नॉलेज सिटीच्या आवारात पारंपरिक वेशभुषेत सजलेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनीनी सांस्कृतिक भारताचे दर्शन घडवित आधुनिकतेतही परंपरेची जाणीव अधोरेखीत केली. निमित्त होते भुुजबळ नॉलेज सिटीच्या ‘मेट बीकेसी २००९’ उत्सवाचे
अत्यंत उल्हासपूर्वक वातावरणात आंतरराष्ट्रीय चित्रकार राजेश सावंत यांच्याहस्ते आणि डॉ शेफाली भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली उदघाटन सोहळा पार पडला. या प्रसंगी सर्व इन्स्टिीटयुटचे प्राचार्य, संचालक, विभागप्रमुख, प्राध्यापक, ट्रस्ट आॅफिस स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
‘ट्रॅडिशनल डे ’ असल्याने कॅम्पसमध्ये विद्यार्थी पारंपरिक वेशभुषेत आले होते. डिफायनिंग फ्युचर या टॅग लाईननुसार साजरा होत असलेल्या संस्थेच्या या उत्सवास खास कारण मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या संस्थेला झालेल्या तीस वर्षांचा पर्ल महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
तीन ते चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात मेट्स गॉट टॅलेंट, मनी मॅग्नेटिझम, रॉक शो, डान्स वर्कशॉप, झुंबा वर्कशॉप, कॅलीग्राफी, कॉर्पोरेट मेकअप, फायनान्शियल मॅनेजमेंट, स्टॉल्स, टेक्नोफेस्ट, क्वीन्स कॉम्पिटिशन, पेंटिंग वर्कशॉप, आय चेकअप, फोटोग्राफी, रायफल शो, एअर शो, गरबा, रोबोटेक वर्कशॉप, नुक्कड , इ. महत्वपूर्ण वर्कशॉप असून कल्चरल नाईट म्हणजेच ग्रँड फिनाले देखील होणार आहे. चित्रकार राजेश सावंत यांनी आपल्या कुंचल्यातून कलाकृती साकारल्या.
(फोटो डेस्कॅनल ६२ ते ६५)