मुक्त विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2018 07:03 PM2018-12-07T19:03:55+5:302018-12-07T19:09:04+5:30

नाशिक : विद्यापीठीय युवक महोत्सवात सादर होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक होऊन त्यांना कलाक्षेत्राची दरवाजे खुले व्हावे यासाठी ...

nsk,start,rainbow,youth,festival,open,university | मुक्त विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवास प्रारंभ

मुक्त विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवास प्रारंभ

Next
ठळक मुद्देमुक्त विद्यापीठ: माजी कुलगुरू वेळूकर यांच्या हस्ते उद्घाटन


नाशिक: विद्यापीठीय युवक महोत्सवात सादर होणाऱ्या सांस्कृतिक सोहळ्यातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक होऊन त्यांना कलाक्षेत्राची दरवाजे खुले व्हावे यासाठी असे महोत्सव व्यावसायिक दर्जाचे होणे अपेक्षित आहे. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन मध्यप्रदेशातील जी.एच. रायसोनी विद्यापीठाचे कुलगुरू तथा मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी केले.
विद्यापीठाच्या प्रांगणातील दादासाहेब फाळके सभागृहात आयोजित १६ व्या महाराष्टÑ राज्य आंतरविद्यापीठ युवक महोत्सव ‘इंद्रधनुष्य २००८’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन होते. व्यासपीठावर आमदार देवयानी फरांदे, मुंबईतील नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा.डॉ. शशी वंजारी, ुमंबई राजभवन प्रतिनिधी व परीक्षण समिती अध्यक्ष डॉ. प्रमोद पाबरेकर, सदस्य अनिल कुलकर्णी, ईश्वर मोटुर्ले, वित्त समिती अध्यक्ष प्रा. संजय चाकणे, वित्त समिती सदस्य सचिन मांडवगणे, डॉ. परिमल फडके, शिलारे, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील उपस्थित होत्या.
यावेळी वेळूकर म्हणाले, आंतरविद्यापीठ इंद्रधनुष्य ही कुठलीही स्पर्धा नाही तर हा विद्यापीठात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा उत्सव आहे. त्यामुळे या उत्सव एक आनंद सोहळा झाला पाहिजे. १९८७ मध्ये तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर यांच्या कार्यकाळात हा युवक महोत्सव सुरू झाला. या महोत्सवातून अनेक कलावंत उदयास आले आहेत. परंतु आता या महोत्सवाला अधिक व्यापक रंग देण्याची गरज असून व्यासासिकतेचे स्वरूप दिल्यास महोत्सवाचे महत्व अधिक वाढेल असे वेळूकर म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात ई. वायुनंदन यांनी नाशिक हे धार्मिक, अध्यात्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृट्या मोठा वारसा लाभलेले शहर असल्याचे म्हटले. आता नाशिक शहर हे शैक्षणिकदृष्ट्या देखील प्रगत होत असल्याने नाशिकची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अशाप्रकारच्या महोत्सवामुळे विद्यापीठांचे महत्व देखील अधिक वाढेल असे कुलगुरू म्हणाले.
आमदार फरांदे यांनी शिक्षणाप्रमाणेच सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुणांच्या सादरीकरणामुळे देखील आपल्या व्यक्तीमत्वाला वेगळे महत्व प्राप्त होत असते. आपल्या कलांचे सादरीकरण करून विद्यार्थ्यांमधील दुसरीबाजूही समोर येते आणि त्यांच्या करियरसाठी कलागुण देखील वेगळे वळण देऊ शकतात असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी ठाकरसी विद्यापीठाच्या कुलगूुरू वंजारी यांनीही भाषण केले.

Web Title: nsk,start,rainbow,youth,festival,open,university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.