शिक्षक दिनी सोशल मिडीयावर ‘उपरोधिक’ पोस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2018 07:00 PM2018-09-05T19:00:25+5:302018-09-05T19:04:58+5:30
नाशिक : राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर शिक्षणक्षेत्र ढवळून निघाले असतांनाच शिक्षकदिनी पिडीत शिक्षकांनी आपल्या भावनांना सोशल मिडीयावर वाट मोकळी करून दिली. राज्य शासनाचे धोरण आणि शिक्षकांच्या व्यथा दर्शविणाऱ्या अनेक पोस्टची देवाणघेवाण शिक्षकांच्या गु्रपवर करण्यात आली. यामुळे काहीसे मनोरंजन झाले तर शिक्षण विभागाला चिमटेही काढण्यात आले.

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जालना, कोल्हापूर आणि परभणी येथे शिक्षकांनी रस्त्यावर उतरून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला तर नाशिकमध्ये देखील काही संघटनांनी काळ्या फिती लावून कामकाज केले. याबरोबरच शिक्षकांच्या सोशल मिडीयावरील व्हॉटसअप ग्रुपवर अनेकांनी उपरोधिक पोस्ट टाकून शासकीय धोरणांवर टिका केली. ‘मान्यता नाही म्हणून त्रस्त असलेल्या बिनपगारी शिक्षक बांधवांना शुभेच्छा’. अशा शब्दात श्ुाभेच्छा देण्यात आल्या तर काहींनी ‘आधी पोटाचे बघा; नंतर शुभेच्छा पोस्ट करा’ अशा सुचनांचेही अदानप्रदान करीत शिक्षकांच्या प्रश्नांबाबत जागृकता दाखविण्याचे आवाहन केले. काहींनी तर ‘शिक्षणमंत्री काही बोलले तर कळवा’ अशा सुचना एकमेकांना करीत न्यायाची अपेक्षा असल्याच्या पोस्ट केल्या आहेत.
‘अंगठ्या कडून सहीकडे नेणाºया आता पुन्हा सहीकडून अंगठ्याकडे नेणाºया’ शिक्षण व्यवस्थेतील बदलाला शिक्षक दिनाच्या शुभेच्या देण्याच्या उपरोधिक पोस्टही हिट ठरल्या. याबरोबरच शहर परिसरात झालेल्या अनेक कार्यक्रमांमध्ये प्रचलित शिक्षण व्यवस्था आणि शासन निर्णयाबाबत जाहिरपणे नाराजी व्यक्त करणारी विधाने देखील अनेक ठिकाणी करण्यात आले.