कालवा समितीच्या बैठका जिल्ह्यांतच होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 08:30 PM2020-01-19T20:30:50+5:302020-01-19T20:32:03+5:30

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार ...

nsk,the,meetings,of,the,canal,committee,will,take,place,the,districts | कालवा समितीच्या बैठका जिल्ह्यांतच होतील

कालवा समितीच्या बैठका जिल्ह्यांतच होतील

Next

नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर करतील, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (दि.१८) जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे यांनी कालवा समितीच्या बैठकांमध्ये स्थानिक आमदारांना विचारात घेऊन त्यांची भूमिका जाणून घेणे महत्त्वाचे असते. असे सांगतानाच जलसंपदामंत्र्यांकडे मुंबईत बैठक घेतली जात असल्याने ही पद्धत बदलली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पालकमंत्री भुजबळ यांनी या संदर्भातील निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सांगताना पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.
जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात यापूर्वी मुंबईत जलसंपदामंत्र्यांकडे बैठका घेण्यास सुरुवात झालेली होती. तसा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. परंतु आता लवकरच या संदर्भातील फेर आदेश निघणार असून, जिल्ह्याच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालीच अशा बैठकांना पुन्हा सुरुवात होईल, अशी शक्यता भुजबळ यांनी वर्तविली.
दरम्यान, पाणी नियोजनासंदर्भातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आमदारांचा सहभाग आणि भूमिका महत्त्वाची असल्याने आमदरांनाच कालवा समितीचे अध्यक्षपद मिळावे, अशी मागणीदेखील काही आमदारांनी यावेळी केली. जिल्ह्याच्या पाणी नियोजनासंदर्भात पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा यापूर्वीचा अनुभव आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणीच अशा बैठका होणार घेण्याचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणारा आहे.

Web Title: nsk,the,meetings,of,the,canal,committee,will,take,place,the,districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.