संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 08:38 PM2020-01-06T20:38:18+5:302020-01-06T20:38:32+5:30
नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी ...
नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्यातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांच्या विविध संघनांच्यावतीने दि. ८ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटना देखील संपात सहभागी असून या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन तेण्यात आले आहे. राज्य व देशातील कर्मचाºयांच्या विविध मागण्यांसाठी केंद्र व राज्यस्तरावरील कामगारांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी देशभरातील २० कोटी कमागार कर्मचारी बुधवारी संपावर जाणार आहेत. जूनी पेन्शन योजना सर्व कर्मचाºयांना लागू करण्यात यावी, अंशदायी पेन्शन योजना रद्द करण्यात यावी, केंद्राप्रमाणे वाहतूक भत्ता, शैक्षणिक भत्ता, शहर भत्ता आतिकालिक भत्ता व इतर सर्व भत्ते राज्य कर्मचाºयांना लागू करण्यात यावेत, सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार शाासकीय कर्मचाºयांना वेतन समितीच्या त्रुटी दूर कराव्यात, राज्यातील महिला कर्मचाºयांना केंद्राने लागू केलेली दोन वर्षांची बालसंगोपन रजा मंजूर करण्यात यावी, केंद्र शाासनाने विहित केल्याप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा लागू करण्यात यावा, सर्व संवर्गातील रिकत पदे तत्काळ भरण्यात यावीत आदि मागण्यांचा पुनरूच्चार महसूल कर्मचारी संघटनांनी केला आहे.