दिड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 08:16 PM2019-10-08T20:16:36+5:302019-10-08T20:17:58+5:30

नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले ...

nsk,voters,participated,in,voter,awareness,campaign | दिड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग

दिड लाख मतदारांचा मतदार जनजागृती मोहिमेत सहभाग

Next
ठळक मुद्देनिवडणूक शाखा : साडेचार हजार मतदान केंद्रांमध्ये जनजागृती


नाशिक : विधानसभा निवडणुकीसंदर्भात राबविण्यात आलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजनेनंतर निवडणूक पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून जिल्ह्यात जनजागृती मोहिम राबविली आहे. जिल्ह्यातील ४५७९ मतदान केंद्रांमध्ये सदर मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेतून सुमारे १ लाख ३४ हजार मतदारांनी प्रत्यक्ष जनजागृती मोहिमेत सहभाग घेतला आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शकतत्वानुसार संपुर्ण जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर ईव्हीएम व व्हिव्हीपॅट जनजागृती मोहिम राबविण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात जनजागृतीचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत प्रत्येक वयोगटातील मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला. शिवाय जनजागृतीसाठी शाालेय आणि महाविद्यालयीन तरुणांमध्ये देखील जनजागृती करण्यात आली. संपुर्ण जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून जनजागृती मोहिम राबविण्यात येऊन प्रत्यक्ष मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला आहे.
जिल्ह्यातील ४५७९ मतदान केंद्रावर १३० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जनजागृती प्रत्याक्षिक मोहिम राबविण्यात आली आहे. या मोहिमेसाठी प्रत्येकी ३० बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात आला आहे. या मोहिमेत १,३४, ०१० मतदारांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदविला असून १,०९,५९८ मतदारांनी प्रत्यक्ष मतदानाच्या प्रात्याक्षिकात सहभाग घेतला आहे.

Web Title: nsk,voters,participated,in,voter,awareness,campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.