ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 07:48 PM2021-07-19T19:48:08+5:302021-07-19T19:49:11+5:30
शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले.
एकलहरे : नवीेन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिनाभरानंतर सोमवारी (दि. १९) रोजी एकलहरे वसाहतीतील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत स्वागत करण्यात आले.
शासनाच्या आदेशानुसार पालकमंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू झाल्या. एकलहरे येथील माध्यमिक विद्यालयातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले. कधी एकदाची शाळा सुरूरु होते, याची ओढ लागलेले विद्यार्थी, शाळा सुरू होण्याची सूचना मिळताच मोठ्या उत्साहाने शाळेच्या प्रांगणात पालकांसह हजर झाले. शाळा सुरू झाल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळेच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी काढण्यात आली होती. ढोल-ताशांच्या गजरात संस्थेचे संचालक सुरेश घुगे, प्राचार्य प्रदीप सांगळे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सरपंच मोहिनी जाधव, राजाराम धनवटे, लकी ढोकणे, सागर जाधव, भास्कर जगताप, आसाराम शिंदे उपस्थित होते.