भटक्या श्वानाच्या पिल्लावर हल्ला भोवला; म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 05:18 PM2019-04-04T17:18:03+5:302019-04-04T17:24:43+5:30

श्वानाचे इवलेसे पिल्लू सोसायटीच्या जिन्यात आले, म्हणून एका इसमाने चक्क लोखंडी गजाने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या पिल्लाचा जीव सुदैवाने वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला असून कदाचित नंतर मृत्यूमुखीही पडला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही.

Nude dog attacked the puppy; Mhrsul police filed a complaint | भटक्या श्वानाच्या पिल्लावर हल्ला भोवला; म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल

भटक्या श्वानाच्या पिल्लावर हल्ला भोवला; म्हसरूळ पोलिसांत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देप्राणी संरक्षण कायद्यांतर्गत क्रूरता निवारण अधिनियमान्वये फिर्याद मारहाण करतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

नाशिक : कायद्याने केवळ मानवालाच संरक्षण दिले आहे, असा गैरसमज अनेकदा काही माणसांचा होतो, आणि त्यामुळे त्यांच्याकडून माणुसकीलाच लाजवेल असे कृत्य केले जाते. मखमलाबाद शिवारात असाच काहीसा प्रकार स्वत:ला ‘माणुस’ म्हणविणाऱ्या एकाने केला. श्वानाचे इवलेसे पिल्लू सोसायटीच्या जिन्यात आले, म्हणून एका इसमाने चक्क लोखंडी गजाने त्याच्यावर हल्ला चढविला. या हल्ल्यात त्या पिल्लाचा जीव सुदैवाने वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला असून कदाचित नंतर मृत्यूमुखीही पडला असावा, अशी शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांनी प्राणीप्रेमींनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्राणीप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयिताविरूध्द प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत क्रूरता निवारण अधिनियमान्वये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्यांच्या फिर्यादीवरून संबंधित संशयित भरत नेरकरविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कॅनडाकॉर्नरवरील विसे मळा येथे राहणाºया शरण्या शशिकांत शेट्टी यांनी संशयित नेरकरविरूध्द फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून त्याच्याविरूध्द प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्राण्यांवर माणसाने हल्ला करत विनाकारण त्यांना क्रूरतेने वागविणे कायद्याने गुन्हा ठरतो. मुक्या जीवांच्या संरक्षणासाठी वाचाशक्ती प्राप्त असलेल्या मनुष्यप्राण्याने नेहमी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
इको-एको, शरण या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना जेव्हा माहिती मिळाली तेव्हा, त्यांनी त्या श्वानाच्या पिल्लाला रेस्क्यू करण्यासाठी धाव घेतली. यावेळी प्राणीप्रेमींनी परिसरात शोध घेतला; मात्र पिल्लू प्राणीप्रेमींना आढळून आले नाही. नागरिकांना त्यांनी माहिती दिली असून कुठे दिसल्यास तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, शरण्या शेट्टी, सुखदा गायधनी, देविका भागवत, राहूल कुलकर्णी, सागर पाटील यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन संशयित नेरकरविरूध्द कायदेशीर फिर्याद दिली आहे. प्राणीप्रेमींनी पिल्लाला मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेजचा पुरावाही पोलिसांना सोपविला आहे.
---
पुरावा प्राप्त झाला आहे. प्राण्यांना क्रूरतेने वागविल्याच्या घटना यापुर्वीही घटना घडल्या आहेत; मात्र त्याविषयी कोणी नागरिक पुढाकार घेत नाही. मारहाण करतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. त्यांच्याविरूध्द कायदेशीर कारवाई पोलिसांकडून होणे अपेक्षित आहे.
- शरण्या शेट्टी, फिर्यादी
---
पोलिस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दिली आहे; मात्र प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत प्रतिबंध घालणारा १९६० सालच्या कायद्यात काळानुरूप तरतुदी होणे आवश्यक आहे. कारण कायद्यात मोठ्या स्वरूपाची दंडात्मक कारवाईची तरतुद असली पाहिजे. सरकारने त्यासंदर्भात पावले उचलण्याची गरज आहे.
- सुखदा गायधनी, प्राणीप्रेमी

Web Title: Nude dog attacked the puppy; Mhrsul police filed a complaint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.