राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 10:16 PM2020-06-25T22:16:24+5:302020-06-25T22:18:47+5:30
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याने वाहनधारकांचा प्रवास सुखाचा झाला असला तरी अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
नाशिक ते पेठ या राष्ट्रीय महामार्गावर सावळघाट व कोटंबीघाट असे दोन अवघड वळणे असलेले घाटरस्ते असल्याने सुसाट सुटणाऱ्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांवर नियंत्रण राखण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी ठिकठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.गुजरात व महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारा हा महामार्ग महत्त्वाचा मार्ग असून, वापी, दमण, दादरा, नगरहवेली, सेल्वास, सुरत, अहमदाबाद शहरातील औद्योगिक वसाहतीमधून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्याने हा रस्ता मुंबई-अहमदाबाद महामार्गाला जोडला गेल्याने लहान-मोठ्या खासगी वाहनांची वर्दळ वाढली आहे. दिशादर्शक फलक नसल्याने दिशाभूल सावळघाट व कोटंबी घाटात अवघड वळणावर रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने अपघात होण्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन दोन्ही घाटामध्ये दिशादर्शक फलक लावण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच करंजाळी येथे गतिरोधक बसविण्याची नागरिकांनी मागणी केली आहे. अनेकदा दिशादर्शक फलक नसल्याने या मार्गावरून जाणाºया नव्या वाहनचालकांचा रस्ता चुकल्याचेही प्रकार घडण्यास आळा बसू शकेल.
वाहनांची संख्याही वाढली आहे. याच रस्त्यावर नाशिकपासून रासेगाव, उमराळे, चाचडगाव, करंजाळी, कोटंबी, पेठ, वांगणी आदी गावे आहेत. करंजाळी व पेठ या दोन्ही ठिकाणी बाजारपेठा असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.