जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा साडेतीन हजार पार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:31 AM2020-12-12T04:31:04+5:302020-12-12T04:31:04+5:30
नाशिक : जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ५३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९९ हजार १८६ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, ...
नाशिक : जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ५३५ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ९९ हजार १८६ बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला असून, जिल्ह्यातील सध्याची ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा साडेतीन हजार पार जाऊन ३ हजार ५०२ रुग्णांवर पोहोचली आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १ हजार ८४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ९४.८८ वर आली आहे.
जिल्ह्यात सध्या नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक २१७, चांदवड ५२, सिन्नर २९८,दिंडोरी ७७, निफाड २७१, देवळा २०, नांदगाव ८०, येवला ०९, त्र्यंबकेश्वर १३, सुरगाणा ०१, पेठ ००, कळवण २१, बागलाण १३८, इगतपुरी १८, मालेगाव ग्रामीण १७ असे एकूण १ हजार २३२ रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात २ हजार ०७८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात १५३ तर जिल्ह्याबाहेरील ३९ असे एकूण ३ हजार ५०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये ९३.६५, टक्के, नाशिक शहरात ९५.६३ टक्के, मालेगाव मध्ये ९२.६४ टक्के, तर जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९१.०२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८८ इतके आहे. जिल्ह्यात आतापर्यंत नाशिक ग्रामीण ७०२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९२८, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून १७२ व जिल्हाबाहेरील ४४ अशा एकूण १ हजार ८४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.