राखी पौर्णिमेनिमित्ताने वाढली बसेसची संख्या; ४० टक्के प्रवासीही वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:18 AM2021-08-20T04:18:40+5:302021-08-20T04:18:40+5:30
नाशिक : कोरेानाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता कुठे महामंडळाची गाडी रुळावर येऊ लागली आहे. सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने बसेसला ...
नाशिक : कोरेानाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आता कुठे महामंडळाची गाडी रुळावर येऊ लागली आहे. सणासुदीचे दिवस सुरू झाल्याने बसेसला प्रवाशांची संख्यादेखील वाढल्याने महामंडळाला बसेसची संख्यादेखील वाढवावी लागली आहे. गेल्या दहा दिवसांत बसेसची संख्या तब्बल ७०ने वाढवावी लागली आहे. प्रवाशांची संख्यादेखील अंदाजे ४० टक्के वाढल्याने बसेसची संख्या वाढवावी लागली आहे. राखी पौणिमेनिमित्ताने बसेसला गर्दी होत असून, येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संख्या अधिक वाढण्याची शक्यतादेखील वर्तविली जात आहे.
--इन्फो--
या मार्गावर वाढल्या फेऱ्या
नाशिक-धुळे
नाशिक-पुणे
नाशिक-बोरीवली
नाशिक-औरंगाबाद
--इन्फो--
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
पंचवटी, राजधानी, तपोवन, जनशताब्दी, सेवाग्राम, मंगला, मुंबई पटना, काशी, पवन, कामयानी, जनता मेल, हावडा एक्स्प्रेस, देवगिरी, मुंबई वाराणसी, महानगरी, पुष्पक.
--इन्फो--
प्रवाशांची गर्दी
- धुळे आणि पुणे गाडीला प्रवाशांची गर्दी होत आहे. सणासुदीचा विचार करता प्रवाशांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. बसमध्ये स्टँगिकला परवानगी नसल्यामुळे ५० सीटवर गाड्या सोडल्या जात आहेत.
- दर अर्ध्यातासाने पुणे गाडी सोडली जात आहे. पुण्याहून येणारे आणि पुण्याला जाणाऱ्यांची संख्या गेल्या दहा दिवसांत अधिक वाढली आहे.
--इन्फो--
अशा वाढल्या बसेस
१७ ऑगस्ट रोजी सर्वाधिक ५३२ बसेस धावल्या. गेल्या ७ जूनपासून सुरू झालेल्या वाहतुकीत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या १० तारखेला ४६३ बस धावत होत्या, तर १७ तारखेला ५३२ धावल्या. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने बसेसच्या संख्येत वाढ होत आहे.
190821\19nsk_16_19082021_13.jpg
बस डमी