बाधित संख्येने ओलांडला दीड हजाराचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 02:41 AM2022-01-13T02:41:58+5:302022-01-13T02:42:20+5:30
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल दीड हजाराचा टप्पा ओलांडत १५४९ पर्यंत धडक मारली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ११८४ नागरिक बाधित आढळून आले असून नाशिक ग्रामीणचे २६७, मालेगाव मनपाचे ४० आणि जिल्हाबाह्यचे ५८ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८७६६ वर पोहोचली असून दिवसभर ११६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने तब्बल दीड हजाराचा टप्पा ओलांडत १५४९ पर्यंत धडक मारली आहे. त्यातही नाशिक मनपा क्षेत्रात सर्वाधिक म्हणजे तब्बल ११८४ नागरिक बाधित आढळून आले असून नाशिक ग्रामीणचे २६७, मालेगाव मनपाचे ४० आणि जिल्हाबाह्यचे ५८ रुग्ण बाधित आहेत. जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८७६६ वर पोहोचली असून दिवसभर ११६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येचा चढता आलेख कायम असून मंगळवारी दीड हजारनजीक तर बुधवारी दीड हजाराचा टप्पा ओलांडून गेली आहे. मात्र, त्यातही दिलासादायक बाब म्हणजे ११६० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या ४ लाख २२ हजार ८४३ वर पोहोचली असून त्यातील ४ लाख ७ हजार ३६४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचा दर ९६.३४ टक्क्यांवर गेली आहे. त्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९६.१७ टक्के, नाशिक ग्रामीण ९६.६० टक्के, मालेगाव मनपा ९६.४७ तर जिल्हाबाह्य ९३.३९ टक्के इतके हे प्रमाण आहे.
इन्फो
उपचारार्थी आणि प्रलंबित दोन्ही ६ हजारांवर
जिल्ह्यात दिवसागणिक हजार ते दीड हजार रुग्णांनी वाढ होऊ लागल्याने उपचारार्थी रुग्णसंख्या ६७१३ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक मनपाचे ५१५५, नाशिक ग्रामीणचे ११९७, मालेगाव मनपाचे ९५, तर जिल्हाबाह्य २६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच प्रलंबित अहवालांची संख्यादेखील ६३५४ वर पोहोचली असून त्यात नाशिक ग्रामीणचे ४८९३ , १३५१ नाशिक मनपा आणि मालेगाव मनपा ११० रुग्णांचा त्यात समावेश आहे.