देवळा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या १००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 08:57 PM2020-07-28T20:57:10+5:302020-07-29T00:49:35+5:30

देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वेगाने वाढत असून मंगळवारी तालुक्यात नवीन २२ कोरोना रूग्णांची भर पडल्यामुळे आता तालुक्यातील रूग्णांची एकूण संख्या १०० झाली आहे.

The number of corona patients in Deola taluka is 100 | देवळा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या १००

देवळा तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या १००

Next
ठळक मुद्देतीन दिवसात रु ग्णांची संख्या वेगाने वाढून दुप्पट

देवळा : तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या शहरासह ग्रामीण भागात वेगाने वाढत असून मंगळवारी तालुक्यात नवीन २२ कोरोना रूग्णांची भर पडल्यामुळे आता तालुक्यातील रूग्णांची एकूण संख्या १०० झाली आहे. दि. २५ जुलैपर्यंत तालुक्यातील रूग्णांची एकूण संख्या ५० असतांना पुढील तीन दिवसात रु ग्णांची संख्या वेगाने वाढून दुप्पट झाल्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. मंगळवार दि. २८ रोजी प्राप्त झालेल्या ९१ कोरोना अहवालांपैकी २१ स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. खाजगी लॅबमध्ये तपासणी केलेल्या एका व्यक्तिचा स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली.
मंगळवारी गाव निहाय बाधित रु ग्ण-
उमराणा - १ (८७ वर्षीय महिला), सावकी-१ (३७ वर्षे महिला), मेशी -१ (३८ वर्षे पुरु ष), विठेवाडी -२ (४५ व १७ वर्ष महिला), खुंटेवाडी-१ (२३ वर्षे पुरु ष), वाखारी -१ (३२ वर्षे महिला), लोहोणेर-२ (४१ वर्षे पुरु ष, ४६ वर्षे महिला), नाशिक -२ (४२ वर्षे महिला, २८ वर्षे पुरु ष), वाजगाव-२ (३९ वर्षे महिला,५७ वर्षे पुरु ष), देवळा- ६ (३७, १३, ३७, २८ वर्षाच्या सर्व महिला, ६२ वर्षीय पुरु ष), कापशी-३ (४८ व २९ वर्षे पुरु ष, ४४ वर्षे महिला). तालुक्यात कोरोना रु ग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. नागरिकांनी शारिरीक अंतर राखावे, मास्कचा वावर करावा, अनावश्यक घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: The number of corona patients in Deola taluka is 100

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.