सुरगाण्यात कोरोना रुग्णांची संख्या नऊवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 09:58 PM2020-07-22T21:58:07+5:302020-07-23T00:56:24+5:30
सुरगाणा : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा, की ठरावीक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहे.
सुरगाणा : येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा, की ठरावीक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी घेण्यात येणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. शहरात चार प्रतिबंधित क्षेत्र आहे.
सुरगाणा येथे पहिला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यापासून आतापर्यंत कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या नऊ झाली आहे. सद्यस्थितीत येथील कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आलेल्या ४४ जणांपैकी नऊ जण पॉझिटिव्ह आहेत, तर १३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना बुधवारी सकाळी सोडण्यात आले आहे.
२२ जण कॉरण्टाइन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांचे स्वॅब घेऊन तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. एक-दोन दिवसात त्यांचा अहवाल प्राप्त होईल. सध्या कॉरण्टाइन सेंटरमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली नऊ पॉझिटिव्ह रु ग्ण तर स्वॅब घेतलेले २२ असे एकूण ३१ जण आहेत. यात महिला व बालकांचा समावेश आहे. पहिला रुग्ण समोर आल्यानंतर येथे सात दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा पॉझिटिव्ह रु ग्ण समोर आल्याने २६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय स्थापन करण्यात आलेल्या समितीने घेतला होता. परंतु पुन्हा नवीन रुग्ण वाढून पॉझिटिव्ह रु ग्ण संख्या नऊ झाल्याने सुरगाणा शहर बंदचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान शहरातील मुख्य बाजारपेठ, तेली गल्ली, झेंडा चौक, गांधीनगरचा काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला असून, हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतत हात धुवावे, गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
----------------
कोरोनाबाधित
रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने खबरदारी म्हणून चौदा दिवस म्हणजे २६ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेतला होता. मात्र पॉझिटिव्ह रु ग्ण नऊ झाले असल्याने २७ जुलैपासून ठरावीक वेळेत दुकाने सुरू करावीत किंवा नाही याबाबत स्थापन करण्यात आलेली समिती शुक्र वारी निर्णय घेईल.
- नागेश येवले, मख्याधिकारी, सुरगाणा, नगरपंचायत
-----------------
जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार नियमांचे पालन नागरिकांनी केल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव टाळता येतो. नागरिकांनी घाबरू नये तर काळजी घ्यावी. कोरोनामुक्त करण्याचे प्रयत्न जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.
- डॉ. प्रफुल्ल वसावे, नोडल आॅफिसर, सुरगाणा कोविड सेंटर