त्र्यंबकेश्वरला कोरोना रुग्णाच्या संख्येत होतेय घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 12:25 AM2021-04-22T00:25:16+5:302021-04-22T00:26:23+5:30
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट दिलासादायक आहे.
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत होणारी घट दिलासादायक आहे. येथील शहरी भागातील कोविड परिस्थिती अक्षरशः हाताबाहेर गेली होती. ती पूर्वपदावर यायला मुख्यत्वे त्र्यंबकेश्वर पोलीस कारणीभूत ठरले आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे कोविड केअर सेंटर, अंजनेरी, हरसूल व त्र्यंबकेश्वर येथील शिवप्रसाद या कोविड केअर सेंटरमधील जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गावात विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी जवळपास गुन्हे दाखल करत ४० हजारांचा दंड वसूल केला आहे. अजून त्र्यंबक पोलिसांकडे अँटिजेन चाचणी आरटीपीसीआर आदी उपकरणे हाताळणारे दिले तर जागेवरच चाचणी होऊन थेट दवाखान्यात पाठवावे लागेल. ही उपकरणे वैद्यकीय स्टाफसह ताब्यात दिले तर विनाकारण व फिरणाऱ्यांवर वचक बसविला आहे.