शहरात कोरोना बळींची संख्या ३०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2020 09:53 PM2020-06-13T21:53:04+5:302020-06-14T01:32:11+5:30

नाशिक : शहरात कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असून, शनिवारी (दि.१३) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३० झाली आहे, तर दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिसर कोरोनाच्या बाबतीत डेंझर झोनमध्ये आहे.

The number of corona victims in the city is 30 | शहरात कोरोना बळींची संख्या ३०

शहरात कोरोना बळींची संख्या ३०

Next

नाशिक : शहरात कोरोनामुळे बळींची संख्या वाढत असून, शनिवारी (दि.१३) एका बाधिताचा मृत्यू झाल्याने बळींची संख्या ३० झाली आहे, तर दिवसभरात तब्बल ३७ रुग्ण आढळले असून, त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात पंचवटी आणि नाशिक मध्य हा परिसर कोरोनाच्या बाबतीत डेंझर झोनमध्ये आहे. शहरात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येचा विचार केला, तर सहाशेपैकी दोनशे रुग्ण एकट्या पंचवटी भागात आहे, तर सर्वाधिक १७ बाधितांचे मृत्यू जुने नाशिक आणि वडाळागावात झाले आहेत.
शहरात नियंत्रित असलेली कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात शहरात केवळ १८ कोरोनाबाधित सापडले होते. मात्र, नंतर शहरातील विविध प्रकारचे निर्बंध शिथिल होताच कोरोनाचा संसर्गदेखील वाढू लागला आहे. विशेषत: दाट वस्तीच्या भागात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तो नियंत्रणात आणणे महापालिकेला कठीण झाले आहे. दररोज ३० ते ५० रुग्ण आढळत असून, सध्या तर दररोज एका बळीची भर पडत आहे. शनिवारी (दि.१३) दुपारी जुन्या नाशकात एका बाधिताचा मृत्यू झाला. सदरचा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामुळे मृतांची संख्या ३० झाली आहे. तर रात्री आठ वाजेपर्यंत ३७ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या सहाशे पार गेली आहे. शहरात सर्वाधिक बळी जुने नाशिक आणि वडाळा भागात झाले आहेत. वडाळागावात पाच, नाईकवाडी पुरा भागात चार, जुन्या नाशिकमध्ये विविध भागांत तीन, तर पखालरोडवर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दाट वस्तीत मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असल्याने नागरिक धास्तावले आहेत. शनिवारी (दि.१३) बिडी कामगारनगर येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सदरची महिला ही जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहे, तर जुन्या गंगापूर नाक्याजवळील एका ५५ वर्षीय संशयित रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला अहे. आरटीओ आॅफिसजवळील ४७ वर्षीय इसमाचा आणि कालिका पेट्रोलपंप या भागातील एका ४५ वर्षीय इसमाचादेखील अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जुन्या नाशकात कोकणीपुरा येथील ६० वर्षीय वृद्धाचा आणि त्र्यंबक गेट येथील ७१ वर्षीय वृध्दाचा आणि चौक मंडईतील मदिना ज्वेलर्स परीसरातील ७१ वर्षीय वृध्दाला कोरोना संसर्ग झाला आहे. या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सारडा सर्कल परिसरात ६३ वर्षीय वृध्दाचा अहवाल पॉझिटिव्ह असून, त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पखाल रोड, मुंबई नाका येथील दोन बाधित आढळले आहेत. तर पंचवटीत रोहिणीनगर भागात दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर रात्री आणखी २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
--------------------
शहरात या भागांत आढळले सर्वाधिक रुग्ण
शहरातील काही भागांतच कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली असून एकाच भागात अनेक रुग्ण आढळले आहेत. यात सातपूर- अंबड लिंकरोड, पंचवटी विभागात क्रांतिनगर, फुलेनगर, कोणार्कनगर, रामनगर, दिंडोरीनगर, स्नेहनगर, म्हसरूळ शिवार या भागात, सिडकोत लेखानगर, पाटीलनगर, लेखानगर, राणा प्रताप चौक, खोडे मळा, पाथर्डी फाटा, तसेच नाशिकरोड येथील धोंडगे मळा, गोसावी वाडी, कॅनॉल रोड, सिन्नर फाटा, गोसावी वाडी, पंचशीलनगर या भागांत सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.

Web Title: The number of corona victims in the city is 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक