कोरोना बळींचे प्रमाण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 01:04 AM2020-08-15T01:04:29+5:302020-08-15T01:07:05+5:30
शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
नाशिक : शहर व जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे व मृत्युदर कमी होण्याचे प्रमाण समाधाकारक वाढले असून, शुक्रवारी नाशिक शहरात पाच तर ग्रामीण भागात तिघे जण दगावले आहेत. मात्र ६२७ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळत असून, शुक्रवारी ग्रामीण भागात १४६ संशयित रुग्णांना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करून घेण्यात आले. त्यामानाने नाशिक शहरातही शुक्रवारी काहीशी संख्या कमी झाली आहे. दिवसभरात ५७३ रुग्ण आढळून आल्याने त्यापैकी काहींना गृहविलीगीकरण कक्षात तर काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहर व जिल्ह्यात ८८६ रुग्ण आढळल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले, तर दुसरीकडे ६२७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आहे.