जायखेडा शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:01 PM2020-06-20T17:01:01+5:302020-06-20T17:03:01+5:30
जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या ...
जायखेडा : बागलाण तालुक्यातील जायखेड्यासह परिसरातील गावांमधील त्या नवीन ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व क्वॉरण्टाइन करण्यात आलेल्या २७ जणांचे स्वॅब शुक्र वारी (दि.१९) घेण्यात आले आहेत. या सर्वांचा अहवाल रविवारी (दि.२१) येणे अपेक्षित असून, या सर्वांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे.
कोरोनाग्रस्त मयत वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. जायखेडा शहर ‘कोरोना’चे ‘हॉटस्पॉट’ झाल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. आता २७ व्यक्तींच्या अहवालाकडे बागलाण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील मोसम खोऱ्यातील जायखेडा, ताहराबाद, सोमपूर, जयपूर (मेंढीपाडे), आमोदे, वाडीपिसोळ तसेच आरम खोºयातील मुंजवाड येथील एकूण ४५ व्यक्ती मयत वाहनचालकाच्या संपर्कात आल्याने यांना ‘कोरोना’चा संसर्ग झाला आहे. यापैकी ४४ कोरोनाबाधित रु ग्ण अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर उर्वरित दोन कोरोनाबाधितांना चांदवड व नाशिक येथील रु ग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
त्या ३२ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात येणाºयांची नोंद घेत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. अनेकांना त्यांच्या राहत्या घरातच होम क्वॉरण्टाइन करण्यात आले आहे. जायखेडा मयताशी संबंधित आकडा आता ४६ वर पोहोचला आहे. त्यातल्यात्यात कोरोनाबाधित मयताच्या अंत्यविधीसाठी गेलेले काहीजण सध्या होमक्वॉरण्टाइन असून, वाढत्या आकड्यामुळे त्यांचे धाबे दणाणले आहे.
गावांत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन, आरोग्य यंत्रणा व पोलीस नागरिकांना दक्षतेचे आवाहन करीत, खबरदारीच्या विविध उपाययोजना राबविण्यात आहेत.
जायखेडा शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चिंताजनक
नवीन २७ जणांचे स्वॅब तपासणीला : ग्रामप्रशासनाच्या नागरिकांना दक्षता घेण्याचे आवाहन