नाशिक शहरात कोरोनाबाधीतांची संख्या ५०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 01:45 PM2020-05-21T13:45:33+5:302020-05-21T13:46:36+5:30
नाशिक शहरात गुरूवारी (दि.२१) दोन जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आहे. यातील एक रूग्ण वडाळ्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कातील हा वीस वर्षीय युवक आहे
नाशिक : कोरोना बाधीतांची संख्या मर्यादीत ठेवण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरूच असले तरी बाहेर जाऊन येणे किंवा बाधीताच्या संपर्कामुळे रूग्णसंख्येत वाढ सुरूच आहे. शहरात सातपूर- अंबड लिंकरोड आणि वडाळा येथील
प्रत्येकी एक अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधीतांची संख्या पन्नास झाली आहेत. यातील अंबड लिंकरोडवरील वृध्दाचाअहवाल येण्याआधीच मृत्यू झाला आहे. अर्थात, महापालिका हद्दीतील ३७ रूग्ण बरे झाले आहेत.
नाशिक शहरात गुरूवारी (दि.२१) दोन जणांचे पॉझीटीव्ह अहवाल आहे. यातील एक रूग्ण वडाळ्यातील आहे. दोन दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाला कोरोनाचा संसर्ग झाला. त्याच्या संपर्कातील हा वीस वर्षीय युवक आहे. सदरचा ट्रक चालक हा कांदा व अन्य शेतमाल घेऊन मुंबईला जात असल्याने त्याला संसर्ग झाल्याचा संशय आहे. दुसऱ्या घटनेत शहरातील सातपुर- अंबड लिंकरोडवरील एका ज्येष्ठ नागरीकाला लागण असल्याचा अहवाल गुरूवारी (दि.२१) प्राप्त झाला. सदर वृध्दाचे कुटूंब त्याच्यासह २ मे रोजी मुंबई येथे गेले होते. ५ मे रोजी ते परत आल्यानंतर १९ मे रोजी त्या वृध्दाला त्रास होऊ लागल्याने नाशिकच्या जिल्हा शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांचा १९ मे रोजी मृत्यू झाला त्यानंतर गुरूवारी अहवाल प्राप्त झाला. त्यांच्या संपर्कात आलेल्या २० व्यक्तींना झाकीर हुसेन रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांचे घसा स्त्राव नमुने घेण्यात येत आहेत. त्यांच्या घराचा परीसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आला आहे.