कोरोनाबळींचा आकडा तीनशे पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 12:17 AM2020-07-10T00:17:59+5:302020-07-10T00:29:59+5:30

जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट कायम असून, गुरुवारी (दि. ९) एकूण आठ बधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ३०६ बळी घेतल्याने चिंता कायम आहे. दरम्यान, नवे २८० रु ग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण रुग्णसंख्या ६ हजार ४०९ एवढी झाली.

The number of coronaries crossed three hundred | कोरोनाबळींचा आकडा तीनशे पार

कोरोनाबळींचा आकडा तीनशे पार

googlenewsNext
ठळक मुद्दे२८० नवे रु ग्ण : जिल्ह्यात दिवसभरात ८ जणांचा मूत्यू

नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट कायम असून, गुरुवारी (दि. ९) एकूण आठ बधितांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. कोरोनाने आतापर्यंत जिल्ह्यात ३०६ बळी घेतल्याने चिंता कायम आहे. दरम्यान, नवे २८० रु ग्ण आढळून आल्याने बाधितांची एकूण रुग्णसंख्या ६ हजार ४०९ एवढी झाली. गुरुवारी दिवसभरात मनपा हद्दीत १८७, तर ग्रामीण भागात ६९ आणि मालेगावात १२ रुग्ण आढळून आले. शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्यामुळे प्रशासनापुढे आव्हान कायम आहे.
मनमाड, इगतपुरी तालुक्यांमध्ये कोरोनाचे रु ग्ण सातत्याने आढळत आहे. गुरुवारी येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या एकूण १ हजार ४५७ झाली तर शहराचा आकडा ३ हजार ५९५ पर्यंत जाऊन पोहोचला आहे.
नाशिक जिल्ह्यात ८४५ संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल केले गेले. यामध्ये ग्रामीण भागातील ३४२ रु ग्ण समाविष्ट आहेत. अद्याप जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ८६३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच शहरातील एक हजार ९६४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मालेगावतील ९१३ रुग्ण, तर जिल्ह्याबाहेरील ९६ रुग्ण उपचारअंती बरे झाले आहेत.
मालेगाव शहरातील ७९ जणांचे स्वॅब गुरूवारी (दि. ९) तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हे अहवाल प्राप्त झाले असून, त्यातील ६६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १३ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे.





बाधितांमध्ये मोहनपीरगल्ली, चर्चगेट, कलेक्टरपट्टा, जैन स्थानक, सिद्धार्थ वाडी, कॅम्प, सोयगाव, दाभाडी, पाटणे येथील रूग्णांचा समावेश आहे.

Web Title: The number of coronaries crossed three hundred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.