नाशिक जिल्ह्यात मृतांची संख्या अकरा

By Admin | Published: August 4, 2016 02:07 AM2016-08-04T02:07:17+5:302016-08-04T02:09:27+5:30

नाशिक जिल्ह्यात मृतांची संख्या अकरा

The number of dead in Nashik district is eleven | नाशिक जिल्ह्यात मृतांची संख्या अकरा

नाशिक जिल्ह्यात मृतांची संख्या अकरा

googlenewsNext


मंगळवारच्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीत आणखी दोघांचा बळी गेला असून, मृतांची संख्या आठ झाली आहे. आणखी तिघा अनोळखी व्यक्तींचे मृतदेह नदीपात्रात सापडल्याने संख्या अकरावर पोहोचली. बुधवारी दुपारी चांदवड तालुक्यातील तिसगाव येथे दहा वर्षाचा बालक नाल्याच्या पाण्यात वाहून गेला आहे. इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर (लोहारवाडी) येथील बबन गंगाराम ठाकरे (४०) हे वाकी खापरी लघुपाटबंधारे खात्याच्या तलावाच्या पाण्याच्या ओढ्यामुळे बुडून मरण पावले, तर तिसगाव येथे चंदू सुकदेव जुमरे हा दहा वर्षाचा मुलगा आईसोबत लेंडी नाल्यात कपडे धुण्यासाठी गेला असता, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आहे. याशिवाय नाशिक येथे दोन अनोळखी व्यक्तींचे गोदावरीच्या पुरात मृतदेह वाहून आले आहेत, तसेच बागलाण तालुक्यातील किकवारी येथे एका अनोळखी पुरुषाचेही पुराच्या पाण्यात प्रेत सापडले आहे.

Web Title: The number of dead in Nashik district is eleven

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.