जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 10:05 PM2020-07-22T22:05:11+5:302020-07-23T00:55:42+5:30
नाशिक : नाशिक महापालिका क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची बाधा खूप कमी प्रमाणात असून, गतवर्षी डेंग्यूचे सहापट रुग्ण अधिक होते. यंदाच्या वर्षी जुलै महिन्यात आतापर्यंत २५ संशयित डेंग्यू रुग्ण दाखल झाले असले तरी त्यातील डेंग्यूबाधित रुग्ण केवळ आठ आढळून आले आहेत.

महापालिका क्षेत्रात दरवर्षी डेंग्यू रुग्णांची संख्या पावसाळ्यात अधिक असते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या उपाययोजना आणि नागरिकांकडूनही घेतली जात असलेल्या दक्षतेच्या पार्श्वभूमीवर यंदा डेंग्यूबाधित रुग्णांच्या संख्येत घट आली आहे. मनपा क्षेत्रात यंदा जुलै महिन्यात आतापर्यंत आठ रुग्ण बाधित आढळले आहेत. गतवर्षी जुलै महिन्याच्या २० तारखेपर्यंत एकूण १४४ संशयित, तर ४८ डेंग्यूबाधित रुग्ण आढळून आले होते. त्या तुलनेत जून महिन्यात गतवर्षी १३ संशयित आणि दोन बाधित होते, तर यंदाच्या वर्षी जून महिन्यात २३ संशयित आणि आठ डेंग्यूबाधित रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. गतवर्षीदेखील जुलै महिन्यापर्यंत डेंग्यूमुळे एकाचाही बळी गेलेला नव्हता. यंदादेखील तिच स्थिती कायम आहे.
---------------
दरवर्षी डेंग्यूचे प्रमाण पावसाळ्यात वाढते असल्याने डेंग्यूसाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथके तसेच समितीची स्थापना केली जाते. मात्र, यंदाच्या वर्षी डेंग्यूवाढीचे प्रमाण अत्यल्प असल्याने तसेच आरोग्य विभागाचे संपूर्ण लक्ष कोरोनावर केंद्रित झाले असल्याने कोणत्याही नवीन समितीचे गठन करण्यात आलेले नाही.