हाॅटस्पॉट गावांची संख्या निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:11 AM2021-04-29T04:11:45+5:302021-04-29T04:11:45+5:30
शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाची आढावा बैठक बुधवारी (दि.२८) शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी भुसे बोलत होते. तालुक्यातील १९ ...
शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाची आढावा बैठक बुधवारी (दि.२८) शासकीय विश्रामगृहात पार पडली. याप्रसंगी भुसे बोलत होते. तालुक्यातील १९ गावांतील ज्या ग्रामदक्षता समित्या आहेत, त्यातील तलाठी, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी कोरोना नियंत्रणासाठी विशेष परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे. या गावातील संशयित रुग्ण गावभर फिरणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच बाधित रुग्णाच्या घराची प्रत्यक्ष पडताळणी करून गरजेनुसार त्यास संस्थात्मक विलगीकरणात ठेवावे. त्याने विरोध केल्यास त्यास थेट मालेगाव येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात यावे. अशा रुग्णांकडून विलगीकरणासाठी प्रतिसाद न मिळाल्यास थेट फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. शहरातील रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी छोटी प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेन्मेंट झोन) तयार केल्यास नागरिकांची गैरसोय टाळण्यासह अशा प्रतिबंधित क्षेत्रात सेवा- सुविधा देण्यासही मदत होणार असल्याचे भुसे यांनी सांगितले.
इन्फो
शहरात लसीकरण कमी
ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात लसीकरणाची टक्केवारी कमी असल्याची खंत व्यक्त करत शहरी भागात मोठ्या प्रमाणात जनजागृती करून लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना भुसे यांनी यावेळी दिल्या. याचबरोबर शहर व तालुक्यातील कोरोना संदर्भात करावयाच्या उपाययाेजनांचाही त्यांनी आढावा घेत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
फोटो- २८ मालेगाव भुसे
मालेगाव येथे कोरोनासंबंधी आढावा बैठकीप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे. समवेत अधिकारीवर्ग.
===Photopath===
280421\28nsk_30_28042021_13.jpg
===Caption===
फोटो- २८ मालेगाव भुसेमालेगाव येथे कोरोनासंबंधी आढावा बैठकीप्रसंगी कृषिमंत्री दादा भुसे. समवेत अधिकारीवर्ग