एकाच दिवसात बाधित रुग्णांची संख्या शंभरी पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:11 AM2020-06-19T00:11:14+5:302020-06-19T00:29:36+5:30
शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आहे.
नाशिक : शहरातील बाधितांच्या संख्येचा दररोज नवा उच्चांक होत असून, गुरुवारी (दि.१८) एकाच दिवशी तब्बल ११६ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. म्हणजेच हजाराच्या घरात पोहोचत आहेत. आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या ४८ झाली आहे.
शहरात दुपारपर्यंत ३६ रुग्ण होते. सायंकाळी मात्र ही रुग्णसंख्या वाढली आणि प्राप्त झालेल्या अहवालानुसार ६३ रुग्ण झाले. यामुळे रुग्णसंख्या ६३ झाली. त्यामुळे रुग्णसंख्या ९९वर पोहोचली; परंतु रात्री पुन्हा १७ जण बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या ११६ झाली, तर आता बाधितांची संख्या ९७७ झाली आहे. दुपारी प्राप्त झालेल्या अहवालानंतर सायंकाळी रुग्णवाढ झपाट्याने झाली.
४०४ रुग्ण झाले कोरोनामुक्त
शहरात बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढत आहे. आत्तापर्यंत ४०४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर ५२५ रुग्ण उपचार घेत आहेत.
वडाळारोड, भारतनगर या भागातदेखील रुग्ण आढळले आहेत. सिडकोतही कामटवाडे, अंबड लिंक रोड शहरातील पश्चिम भागातील राका कॉलनी आणि सावरकरनगर येथेही दोन रुग्ण आढळले आहेत. गंजमाळ येथील एका ६० वर्षीय महिलेचा आणि त्यानंतर पंचवटीतील गणेशवाडीतील ७० वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे.